तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पंचवीस गुन्हे दाखल असलेली कुख्यात दलाल कल्याणी देशपांडे आणि तिच्या साथीदारावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मोक्कासंदर्भातील प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. दोन महिन्यांपूर्वी बिबवेवाडी भागातील गुंड बापू नायर याच्या आईवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती.

जयश्री ऊर्फ कल्याणी उमेश देशपांडे (वय ४६, रा.बालाजी निवास, पाषाण-सूस रस्ता) आणि तिचा साथीदार रवी ऊर्फ प्रदीप रामहरी गवळी (वय २९, रा.कंदलगाव, ता.मोहोळ, सोलापूर) असे मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कल्याणीने तिच्या साथीदारांमार्फत पुणे शहरात सन २००२ पासून वेश्याव्यवसायाचे जाळे तयार केले होते. तिने अनेक तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले होते. कोथरूड, डेक्कन, हिंजवडी, चतु:शंृगी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. सन २००५ मध्ये तिच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तिला सन २००८ आणि २०१४ मध्ये शहरातून तडीपार करण्यात आले होते.

Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान
AAP morcha kolhapur
केजरीवालांच्या अटकेविरोधात ‘आप’चा कोल्हापुरात भाजप कार्यालयावर मोर्चा; पोलिसांशी झटापट

तीन महिन्यांपूर्वी कोथरूडमधील भुसारी कॉलनीत एका सदनिकेवर छापा टाकून पोलिसांनी कल्याणीच्या साथीदारांना पकडले होते. तिच्या तावडीतून तरुणींची सुटका करण्यात आली होती. या गुन्ह्य़ात पसार असलेल्या कल्याणीला कोथरूड पोलिसांनी पकडले. त्यानंतर कल्याणी आणि तिचा साथीदार रवी याच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी तयार केला.

पोलीस आयुक्त शुक्ला आणि सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. डेक्कन विभागाचे सहायक पोलीस आयुक्त तुकाराम गौड या प्रकरणाचा तपास करत आहेत.