मुलांची टवाळखोरी, मुलींची छेडछाड, रॅगिंग रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा उपक्रम

शाळा तसेच महाविद्यालयाच्या परिसरात टवाळकी करणारी मुले, मुलींची छेड काढणे, रॅगिंगसारख्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस काका’ उपक्रमाला शहरातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत शहरातील ७८४ शाळांमध्ये ‘पोलीस काका’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळांमधील मुख्याध्यापक, प्राचार्याशी समन्वय साधून पोलिसांकडून गैरप्रकार रोखण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
girl kidnap viman nagar
खंडणीसाठी विमाननगरमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण

पुणे पोलिसांकडून शाळा तसेच महाविद्यालयातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी गेल्या महिन्यांत गैरप्रकार रोखण्यासाठी ‘पोलीस काका’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयात गैरप्रकार घडल्यास बऱ्याचदा मुलांकडून पालकांना माहिती दिली जाते. भीतीमुळे मुले विशेषत: मुली पालकांपासून काही गोष्टी दडवून ठेवतात. शाळेच्या आवारात पोलीस पोहोचल्यास मुलांना एकप्रकारचा आधार मिळेल. मुले न घाबरता पोलिसांना त्यांच्या समस्या सांगू शकतील, या विचाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला, अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

ते म्हणाले, की शहरातील अनेक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांकडून ‘पोलीस काका’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद देण्यात आला आहे. आतापर्यंत शहरातील ७८४ शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘पोलीस काका’ पोहोचले आहेत. या उपक्रमासाठी पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस फौजदार दर्जाच्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. शक्यतो चाळीस वर्षांच्या पुढील पोलिसांना मुलांच्या समस्या माहीत असतात. त्यामुळे या उपक्र मात सहभागी झालेले १९५ पोलिसांना मुलांशी कशा प्रकारे संवाद साधायचा, त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवायच्या किंवा जाणून घ्यायच्या याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात ‘पोलीस काका’ उपक्रमाची माहिती देणारी भित्तिपत्रके लावण्यात आली आहे. साधारणपणे एका पोलिसावर पाच शाळांची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्या पोलिसाचा मोबाइल क्रमांक, छायाचित्र भित्तिपत्रकावर नमूद करण्यात आले आहे.

कायदा काय सांगतो..

सन २०१२ मध्ये बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोस्को) या कायद्याची निर्मिती करण्यात आली. या कायद्यातील कलम २१ अनुसार अठरा वर्षांखालील विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही शाळांची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. शाळेच्या आवारात होणारी छेडछाड, सायबर गुन्हे, दादागिरी, अमली पदार्थाची विक्री अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून ‘पोलीस काका’ या उपक्रमातून पुढाकार घेण्यात आला आहे.

जेव्हा विद्यार्थ्यांकडून शिक्षिकेला त्रास दिला जातो..

गेल्या महिन्यात मुंढवा भागातील एका कनिष्ठ महाविद्यालयात नव्याने रुजू झालेल्या शिक्षिकेशी एका अकरावीतील विद्यार्थ्यांने गैरवर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने ‘पोलीस काकां’ ना या प्रकाराची माहिती दिली. पोलीस हवालदार पांडुरंग पवार महाविद्यालयात पोहोचले. प्राचार्य आणि शिक्षिकेशी पवार यांनी संपर्क साधला. त्यांची बाजू ऐकून घेतली. तेव्हा पोलिसांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधला. त्या मुलाला कनिष्ठ महाविद्यालयातून तात्पुरत्या कालावधीसाठी कमी करण्यात आले आहे. त्याच्यात सुधारणा झाल्यास त्याला पुढील परीक्षेसाठी बसून दिले जाणार आहे. असा प्रकार पुन्हा घडल्यास मुलावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्याच्या पालकांना सांगण्यात आले आहे, असे सहायक आयुक्त गणेश गावडे यांनी सांगितले.