22 August 2017

News Flash

पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव वर्षावरून वाद; १२५ नव्हे १२६वे वर्ष असल्याचा भाऊ रंगारी मंडळाचा दावा

महापालिकेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती बांधून आंदोलन

पुणे | Updated: August 12, 2017 5:54 PM

पुणे : भाऊ रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा १२६व्या वर्षात पदार्पण करीत असताना पुणे महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करीत असल्याचा दावा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात आला आहे. या प्रकाराविरोध मंडळाकडून आज मंडई चौकात कार्यकर्त्यांनी काळया फिती बांधून आंदोलन छेडले, यावेळी त्यांनी महापालिकेच्या भूमिकेचा निषेध केला. तसेच आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरु होणाऱ्या कार्यक्रमात सत्कार स्वीकारणार नसल्याची भूमिका जाहिर केली आहे.

याविषयी मंडळाचे विश्वस्त सूरज रेणुसे म्हणाले, “सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे १२६वे वर्ष असल्याच्या पुराव्यांसहित महापालिका ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, तरीही याची दखल न घेता महापालिका चुकीचा कार्यक्रम आखत असून ही बाब निषेधार्ह असून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो”. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सव सुरु केला जाणार आहे. याबाबत आज कार्यक्रम ठिकाणी भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त पालिकेतर्फे विशेष बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यात आले आहे. या लोगोवर सुरूवातीला लोकमान्य टिळकांचे चित्र होते. मात्र, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने टिळकांचे चित्र बोधचिन्हावरून काढून टाकले आहे. बोधचिन्हाचा आकार मर्यादित असल्याने त्यावर लोकमान्य टिळकांचे छायाचित्र वापरले नसल्याचे पालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

भाऊ रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याने त्यांचा सन्मान ठेवावा, अशी मागणी श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्यावतीने मागील दोन वर्षांपासून करण्यात येत आहे.

First Published on August 12, 2017 5:52 pm

Web Title: public ganesh festival year not 125th claims bhau rangari mandal to be the 126th year
 1. R
  rohan
  Aug 13, 2017 at 10:20 am
  घोळ घालत राहणे...प्रत्येक गोष्टीत.... अहो किती दिवस तेच ते आणि तेच ते.... बिचारे ते मोठे लोक कर्म करून उत्सव करून...देशाला स्वतंत्र देऊन शांत होऊन पण बरीच वर्षे झाली...पण अजूनही हे पुढचे काही वाद कमी करत नाही... बहुतेक पेटंट ही संकल्पना इकडूनच उदयाला आली वाटते... नशीब अजून देव गणपती बद्दल कुणी हक्क सांगत नाही आहे.... सगळं इगो प्रॉब्लेम झाला आहे वाटते...
  Reply
 2. A
  arun
  Aug 12, 2017 at 10:24 pm
  मुंबई - पुण्यात हिंदू-मुसलमानांच्या दंगली सुरु झाल्या. त्यामुळे सामुदायिक संघटनेची समाजाला अतिशय गरज आहे हे लोकमान्य टिळक यांच्या लक्षात आलं. म्हणून इंग्रजांच्या बंदी येण्याच्या शक्यतेला टाळण्यासाठी ६ आठवड्यात लोकमान्यांनी गणपती उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. कारण यामुळे सभा भरवणे, भाषणे करणे यावर इंग्रजांना काहीही करता आलं नाही. या सभांमधून देशभक्तीपर गीतं, पोवाडे म्हटले गेले. जनजागृतीची भाषणं नेत्यांना करता आली. लोकमान्यांची हि समाजाला नवीन वळण देण्याची कल्पना पुण्यातील मान्यवर श्रेष्ठींना अतिशय आवडली. याची पहिली बैठक बाबामहाराजांच्या वाड्यात झाली. त्यांना दगडूशेठ, भाऊसाहेब रंगारी, तरवडे वकील, गावडे पाटील यांनी साथ दिली. गणपती उत्सव त्या आधीही पुण्यात साजरा होत असे पण त्याला लोकजागृती करता यावी म्हणून सामाजिक स्वरूप लोकमान्यांनी दिलं आणि त्याला भाऊसाहेब रंगारी यांची साथ होती.
  Reply