नोटाबंदीच्या समर्थनार्थ रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत खासदार संजय काकडे यांनी शहर भाजपमध्ये स्वत:चे नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपच्या या सहयोगी सदस्य खासदाराच्या पक्षबाह्य़ सत्ताकेंद्रामुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे सहयोगी सदस्य असलेले खासदार संजय काकडे यांचा पक्षाच्या कामकाजात थेट हस्तक्षेप होत आहे. शहराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून त्यांनी काही पक्षप्रवेश घडवून आणले होते. त्यातही काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पक्षावर टीका होऊन मुख्यमंत्रीही अडचणीत आले होते. परस्पर पक्षप्रवेशाबरोबरच शिवसेनेसमवेत भाजपला युतीची गरज आणि आवश्यकताही नाही, असे विधान करून काकडे यांनी नवा वादही ओढावून घेतला होता.

Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
Uddhav thackeray
हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा संघर्ष; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्ला
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
Do not participate in party campaign without consent confusion due Vanchits new Instructions
… तोपर्यंत मित्र पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नका, वंचितच्या फतव्याने संभ्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनार्थ काकडे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीकडे भाजपच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली. मात्र जोरदार शक्तिप्रदर्शन मुळे ही रॅली नक्की नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविण्यासाठी होती की काकडे यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी होती, अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या रॅलीमध्येही काकडे यांना मानणाऱ्या काही मोजक्या नगरसेवकांचाचा समावेश होता. रॅली हा पक्षाचा कार्यक्रम नव्हता. रॅलीबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेण्यात आले नव्हते. रॅलीमध्ये गर्दी होती तरी त्यामध्ये तिकिटासाठी इच्छुक असलेल्यांची भाऊगर्दी होती. रॅलीतील सामान्य नागरिकांना रॅली कशासाठी काढण्यात आली, हेही सांगता आले नाही. त्यामुळे एकूणच रॅलीच्या माध्यमातून शहर भाजपच्या नेतृत्वालाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे.

अन्य पक्षातील काही जणांना भाजपमध्ये प्रवेश देऊन काकडे यांनी स्वत:चा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता शक्तिप्रदर्शनाने नेतृत्व लादण्याचा प्रकार सुरू झाला आहे, अशीच भावना पदाधिकाऱ्यांकडून खासगीत व्यक्त होत आहे. एका बाजूला पक्षाकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असतानाच दुसरीकडे काकडे यांचे या प्रकारचे उपक्रम पक्षाला अडचणीत आणतील. शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली शहरात मेळावे, कोपरा सभा असे उपक्रम सुरू केले असून काकडे यांच्या पक्षबाह्य़ सत्ताकेंद्रामुळे पक्षाला त्याचा फटका बसेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे. त्यामुळेच पक्षाच्या निष्ठावंत, जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना काकडे यांनी स्वत:हून लादलेले नेतृत्व कितपत पटेल, याबाबातही शंका व्यक्त केली जात आहे.