महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना अंतिम होताना सिंहगड रस्त्यावरील दोन प्रभागात मोठे फेरबदल झाल्यानंतर त्याचे परिणाम दिसून येण्यास सुरुवात झाली. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्यासह एकूण २६ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि आमदार तसेच जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे या वेळी उपस्थित होते. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असलेले प्रसन्न जगताप यांनी सन २००७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यामध्ये ते निवडून आले. उपमहापौरपदाचाही मान त्यांना मिळाला. मात्र गत निवडणुकीत ते भाजपचे उमेदवार श्रीकांत जगताप यांच्याकडून पराभूत झाले होते.

Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !
Congress manifesto for Lok Sabha election 2024 will be announced and campaign will be done across the country regarding 25 promises
काँग्रेसचीही ‘घरघर हमी’! पंचसूत्रीतील २५ आश्वासनांबाबत देशभर प्रचार
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यानंतर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन जगताप हे पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. प्रभागांचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या प्रभागात मोठे फेरबदल झाले. ते भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणात अनुकूल आहेत. त्यामुळेच जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा रंगली होती. या प्रभागातून भाजपचेच विद्यमान नगरसेवक श्रीकांत जगताप यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची मोठी संधी आहे. प्रभागातील एक जागा ही ओबीसी आणि एक जागा ही पुरुष खुल्या गटासाठी आहे. त्यामुळे खुल्या जागेवरून प्रसन्न जगताप यांना संधी मिळेल, अशीही चर्चा आहे. जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे सिंहगड रस्त्यावरील भाजपची ताकद वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे.