पुण्यात नालेसफाईच्या कामात दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटले आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस पडल्यानंतर काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. ज्या अधिकाऱ्यांनी आपले काम नीट केले नाहीये त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यापूर्वी पुण्यातल्या १२४ ठिकाणी पाणी साठण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ते साठू नये म्हणून कामे लवकर उरका असे आदेश महापौरांनी दिले होते. तरीही पुण्यातल्या काही ठिकाणी पाणी साठण्याच्या घटना कशा घडल्या? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. पावसामुळे उपनगर आणि पेठ भागातल्या काही घरांमध्ये पाणी गेले. ज्यानंतर पुणेकरांना त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात पुण्याच्या नालेसफाईच्या कामांवर प्रश्न निर्माण झाला आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात

नालेसफाईवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला, असे असूनही पुणेकरांना त्रास का सहन करावा लागला? असे मुक्ता टिळक यांनी विचारले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी जी पाहणी करण्यात आली तेव्हाही प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. तरीही पुण्यात पाणी साठले. त्यामुळे आता ज्या अधिकाऱ्यांनी महापौरांचे ऐकण्यात दिरंगाई केली आहे त्यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित आहे. ही कारवाई नेमकी काय होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.