पुणे महापालिकेतील भाजपच्या दोन्हीं कार्यालयाची आणि इतर वस्तूंच्या तोडफोडीच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी आंदोलन केले. महापालिकेतील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि प्रकरणातील आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मागील आठवड्यात स्वीकृत नगरसेवक उमेदवारीवरून महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये भाजपच्या गणेश घोष आणि गणेश बिडकर यांच्यात वादाचा प्रकार घडला. यामध्ये गणेश घोष यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील भाजपच्या दोन्हीं कार्यालयाची आणि इतर वस्तूंची तोडफोड केली होती. या घटनेत पालिका प्रशासनाचे साडे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”

भाजप नेत्यांनी केलेले प्रशासकिय मालमत्तेची नुकसान भरपाई कोण देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी भाजप पक्ष नुकसान भरपाई देईल, अशी घोषणा केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे शहरात पक्षाची प्रतिमा मालिन झाल्याने महापालिकेतील नुकसान भरपाई म्हणून काल गणेश घोष यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला.
न्याय प्रविष्ठ घटना असताना. महापौरांनी कोणत्या आधारे घोष यांचा धनादेश स्वीकारला, असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला. तसेच संबंधीत व्यक्तीने न्यायालयासमोर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. भाजप आरोपींना पाठीशी घालत आहे. आम्ही गुंडगिरी खपवून घेणार नाही. अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या की, ‘महापालिकेत मागील आठवड्यात घडलेला तोडफोडीचा प्रकार हा निषेधार्थ आहे. तसेच नुकसान भरपाई थेट महापौरांकडे देणे हे देखील चुकीचे आहे. या पुढील काळातही अशा तोडफोडीच्या घटना घडतील.’ असे सांगत महापौरांकडे धनादेश देऊन भाजपला काय संदेश द्यायचा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.