गणेशोत्सवाच्या काळात नियमांचे पालन आणि संवादाच्या दृष्टीने उपाययोजना

गणेशोत्सवाच्या काळात सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांचे व्हॉट्स अ‍ॅप गट तयार करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून उत्सवाच्या काळात संवाद ठेवावा आणि उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले.

िपपरी चिंचवड महापालिका, पुणे पोलीस आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची संत तुकारामनगर येथील प्र. के. अत्रे नाटय़गृहात शांतता बठक आयोजित करण्यात आली होती. या बठकीला खासदार श्रीरंग बारणे, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू असवाणी, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, मंडळांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. बठकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. हौदांची तसेच नदीवर घाटांची संख्या वाढवावी, महावितरणला सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या सूचना द्याव्यात, महापालिका देत असलेल्या पुरस्काराची रक्कम वाढवावी, स्पध्रेचे पारितोषिक देताना स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा, विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा, निर्माल्य कलशांची संख्या वाढवावी आदी सूचना बैठकीत करण्यात आल्या.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पदाधिकाऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून न्यायालयाच्या आदेशाचा आदर करण्याचे आवाहन केले. उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवनाग्या मंडळांनी घ्याव्यात, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक मंडळाचे व्हिडीओ रेकॉर्डिग करण्यात येणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. समाजकंटकांनी उत्सवाचा गरफायदा घेऊ नये यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत. महत्त्वाचे क्रमांक स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी लावावेत. तसेच, अपमानास्पद वागणूक देऊन वर्गणी गोळा करू नये, असे आवाहनही शुक्ला यांनी या वेळी केले.

महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, की मंडळांना आवश्यक परवाने काढण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी सर्व परवाने देण्यात येणार आहेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडप टाकताना रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच वाहने रस्त्यावर लावून वाहतूक कोंडी करू नये. पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. निर्माल्य नदीमध्ये टाकू नये. निर्माल्य टाकण्यासाठी नदीवर निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत. अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत. तसेच परवनागी न घेता फ्लेक्स लावल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनीही त्यांच्या सूचना या बठकीत केल्या. पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचलन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.