उद्योजकाकडे कामाला असलेल्या युवकाकडून अपहरणाचा कट

निगडीतील पूर्णानगर भागातून ओम खरात या सात वर्षांच्या मुलाचे शनिवारी (२३ सप्टेंबर) अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले. ओमचे वडील संदीप यांच्या कारखान्यात काही महिन्यांपूर्वी कामाला असलेल्या युवकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अपहरण केले. त्यानंतर बीडमधील गेवराई येथे ओमला मोटारीतून नेले. त्याच्या वडिलांकडे ओमच्या सुटकेसाठी साठ लाखांची खंडणी मागण्यात आली होती. तेथून ओमला निगडीत परत घेऊन येणाऱ्या आरोपींना पोलीस मागावर      असल्याची कुणकुण लागली आणि त्यांनी सोमवारी रात्री त्याला निगडी परिसरात सोडून दिले.  त्यानंतर पोलिसांनी त्याला पालकांच्या ताब्यात दिले. लगोलग तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींचा माग काढला.

father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…

या प्रकरणी पोलिसांकडून अक्षय काशिनाथ जामदारे (वय २१, रा. हरगुडेवस्ती, गणेशनगर, तळवडे) आणि रोशन नंदकुमार शिंदे (वय २०, रा. सप्तशंृगी हाउसिंग सोसायटी, गणेशनगर, तळवडे) यांना अटक करण्यात आली आहे. जामदारेने ओमचा अपहरणाचा कट रचला. त्याचा साथीदार रोशनने अपहरण करण्यासाठी मित्राच्या मोटारीचा वापर केला. ओमचे वडील संदीप यांच्या कारखान्यात अक्षय कामाला होता. मुलाचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांकडून या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी चारशे पोलिसांची नेमणूक करण्या आली होती. पोलिसांनी अहोरात्र तपास करून आरोपींचा माग काढला, अशी माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, शशिकांत शिंदे, उपायुक्त गणेश शिंदे, पंकज डहाणे या प्रसंगी उपस्थित होते.

आरोपी रोशन आणि अक्षय हे दोघे जवळचे मित्र आहेत. त्यांनी जानेवारी महिन्यात देहूगावात वाहन चालविण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी एका खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. व्यवसायात नुकसान झाल्याने त्यांना व्यवसाय बंद करावा लागला होता. सावकराकडून व्याजावर घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांनी ओमचे अपहरण करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी संदीप खरात यांच्या घरावर पाळत ठेवली होती. शनिवारी दुपारी घरासमोर खेळणाऱ्या ओमचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. देहूगावात एका टायरच्या दुकानातून त्यांनी चार्जिगला लावलेल्या मोबाइलमधून सीमकार्ड चोरले होते. चोरलेल्या सीमकार्डचा वापर करून त्यांनी ओमच्या वडिलांशी संपर्क साधला आणि साठ लाखांची खंडणी मागितली.

पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याची चाहूल

ओमचे अपहरण केल्यानंतर त्याला घेऊन शनिवारी ते बीडमध्ये गेले. गेवराई भागात अक्षयचे घर आहे. तेथून ते पुन्हा ओमला घेऊन रविवारी पुण्याकडे निघाले होते. जवळपास चारशे पोलीस अपहरणकर्त्यांच्या मागावर होते. निगडीच्या दिशेने परतणाऱ्या अक्षय आणि रोशनने महामार्गावर पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत असल्याचे पाहिले होते. त्यामुळे त्यांनी रस्ता बदलला. आडवळणाने ओमला घेऊन ते सोमवारी रात्री निगडीत आले. दरम्यान, संदीप खरात यांच्याशी पुन्हा संपर्क साधून त्यांनी खंडणी मागितली. तेव्हा संदीप यांनी तडजोडीत सतरा लाख रुपये देण्याचे मान्य केले. पोलिसांकडून प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. ओमची सुखरूप सुटका करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. पोलीस मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागली होती. त्यामुळे त्यांनी सोमवारी रात्री ओमला सोडून दिले आणि त्याच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांची ‘वॉर रूम’

अपरहणकर्त्यांच्या तावडीतून ओमची सुखरूप सुटका करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. निगडीतील केरळ भवन येथे खास वॉर रूम सुरू करण्यात आली होती. वरिष्ठ आधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज तेथे तळ ठोकून होती. तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग काढण्यात येत होता. पसार झालेले आरोपी ट्रान्सपोर्टनगर भागात असल्याची माहिती पोलीस हवालदार राजेश परंडवाल यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावून दोघांना पकडले. गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्र तोडकर, नितीन भोयर यांनी ही कारवाई केली.

पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्याची चाहूल

ओमचे अपहरण केल्यानंतर त्याला घेऊन शनिवारी ते बीडमध्ये गेले. गेवराई भागात अक्षयचे घर आहे. तेथून ते पुन्हा ओमला घेऊन रविवारी पुण्याकडे निघाले होते. जवळपास चारशे पोलीस अपहरणकर्त्यांच्या मागावर होते. निगडीच्या दिशेने परतणाऱ्या अक्षय आणि रोशनने महामार्गावर पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत असल्याचे पाहिले होते. त्यामुळे त्यांनी रस्ता बदलला. आडवळणाने ओमला घेऊन ते सोमवारी रात्री निगडीत आले. दरम्यान, संदीप खरात यांच्याशी पुन्हा संपर्क साधून त्यांनी खंडणी मागितली. तेव्हा संदीप यांनी सतरा लाख रुपये देण्याचे मान्य केले. पोलिसांकडून प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. ओमची सुखरूप सुटका करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. पोलीस मागावर असल्याची चाहूल आरोपींना लागली होती. त्यामुळे त्यांनी सोमवारी रात्री ओमला सोडून दिले आणि वडिलांना या घटनेची माहिती दिली.