आदेश धुडकाविणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा पोलिसांचा इशारा

दिवाळीत आकाशात सोडण्यात येणाऱ्या पेटत्या आकाशदिव्यांमुळे दुर्घटना घडतात. या पाश्र्वभूमीवर पोलिसांकडून आकाशात सोडण्यात येणाऱ्या पेटत्या आकाशदिव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांचा आदेश धुडकावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार

दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात आग लागण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. दिवाळीत आकाशात सोडणारे अग्निबाण तसेच पेटत्या दिव्यांमुळे (फ्लाइंग लँटर्न) आग लागते. झाड व घराच्या छतावर पेटते दिवे पडल्यानंतर आग लागते. काही वर्षांपासून दिवाळीत आकाशात पेटते दिवे सोडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पेटत्या दिव्यांमुळे दुर्घटना घडते. त्यामुळे पोलिसांकडून यंदाही आकाशात सोडण्यात येणाऱ्या पेटत्या दिव्यांवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संजयकुमार बावीस्कर यांनी दिली.  शहरातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, गाडगीळ पूल येथे मोठय़ा संख्येने युवक-युवती जमतात. त्यांच्याकडून आकाशात पेटते दिवे सोडले जातात, तसेच चौकाचौकात थांबणाऱ्या उच्छादी टोळक्यांकडून अग्निबाण  आणि पेटते दिवे सोडले जातात.

गतवर्षी ३१ आगी

गतवर्षी २९, ३०, ३१ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी होती. तीन दिवसांत ३१ आगी शहरातील वेगवेगळ्या भागात लागल्या होत्या. त्यापैकी सतरा ठिकाणी  फटाक्यांमुळे आग लागली होती, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

 

दिवाळीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगी लागण्याच्या घटना घडतात. बहुसंख्य ठिकाणी पेटते आकाशदिवे, तसेच अग्निबाणांमुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. छतावर असलेले अडगळीचे सामान,तसेच झाडांवर पेटते आकाशदिवे पडल्यास आग लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या फटाक्यांचा वापर न केल्यास आगी लागण्याच्या दुर्घटना कमी होतील.

प्रशांत रणपिसे, मुख्य आधिकारी अग्निशमन दल

रस्त्यावर स्वैरपणे फटाके उडवणे, तसेच फटाका विक्री करणाऱ्या दुकानांच्या परिसरात फटाके उडविण्यास मनाई आहे. साखळी फटाक्यांमुळे मोठा आवाज निर्माण होतो. साखळी फटाके, पेटते आकाशदिवे सोडणे तसेच अग्निबाण सोडण्यास मंगळवारपासून (१७ ऑक्टोबर) २२ ऑक्टोबपर्यंत पोलिसांकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अनुसार कारवाई करण्यात येईल.

रवींद्र कदम, सहपोलीस आयुक्त, पुणे पोलीस