पालकमंत्री गिरीश बापट यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम रिलायन्स इन्फ्रा कंपनीमार्फत सुरू आहे. या कामासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस संरक्षण देण्याची तयारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली आहे. तरी देखील या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. रस्त्याचे उर्वरित काम तत्काळ सुरू करावे, अन्यथा रिलायन्स इन्फ्राकडून हे काम काढून घ्यावे, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना केली.

sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली. त्यामध्ये बापट यांनी जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, महावितरणचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस.डी. चिटणीस यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘चांदणी चौक ते ताम्हिणी घाट रस्त्याच्या भूसंपादनाच्या स्थितीचा आढावा या बठकीत घेण्यात आला. तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, चौफुला या रस्त्यांवरून शहरात येणारी अवजड वाहतूक वळवता येऊ शकते. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करा. तसेच या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. रस्त्यांच्या कामांना गती येण्यासाठी विविध कामांचे टप्पे करून सूक्ष्म नियोजन करावे.’

‘जिल्ह्य़ातील रस्त्यांच्या कामांबाबत दर पंधरा दिवसांनी आढावा घेण्यात येईल. रस्त्यांच्या प्रलंबित कामांबाबत जबाबदारी निश्चित करून काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी योग्य नियोजन करावे, कामामध्ये अडचणी असल्यास त्याबाबतचा सविस्तर आढावा सादर करावा. सर्व विभागांनी तत्काळ अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्ह्य़ात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देणार असून यासाठी विविध विभागांशी समन्वय साधून कामे त्वरित पूर्ण करावीत,’ अशा सूचनाही बापट यांनी या वेळी दिल्या.

या कामाची निविदा लवकरच काढण्यात येणार असून एक जानेवारीपर्यंत काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि रस्त्यांच्या कामांचा विभागानुसार आढावा या वेळी घेण्यात आला.

नाशिक फाटा ते इंद्रायणी नदी या रस्त्यासाठी लागणारी ८० टक्क्यांहून अधिक जमीन ताब्यात आली असून या मार्गातील प्रस्तावित बीआरटी मार्ग पिंपरी चिंचवड महापालिकेने काढून टाकला आहे. त्यामुळे काम सुरू करण्यात अडथळा येणार नाही. इंद्रायणी नदी ते खेड रस्त्याच्या भूसंपादनाची निवाडा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सप्टेंबरअखेर सर्व निवाडे जाहीर केले जातील.

– सौरभ राव, जिल्हाधिकारी