नागरिकांकडून ४ ऑगस्टपर्यंत सूचना व हरकती मागवल्या

पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने ससाणेनगर, महंमदवाडी, सय्यदनगर आदी भागांत जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली.

ससाणेनगरकडून हांडेवाडी व महंमदवाडीकडे जाताना व येताना ससाणेनगर रेल्वे गेट क्रमांक सात या ठिकाणी वारंवार वाहतूककोंडी होत असते व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाययोजना म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हडपसर, वानवडी वाहतूक विभागांतर्गत ससाणेनगरकडून हांडेवाडीकडे जाणारी वाहतूक रेल्वे फाटक ओलांडल्यानंतर एकेरी राहील. (हांडेवाडी रस्त्याने ससाणेनगरकडे येता येणार नाही.) हांडेवाडीहून ससाणेनगर रेल्वे फाटकाकडे येण्यासाठी श्रीराम चौकातून डावीकडे वळून डी. पी. रस्त्याने सुवर्णमंगल कार्यालय चौक येथून उजवीकडे वळून महंमदवाडी रस्त्याने क्रमांक सातकडे येता येईल.

रेल्वे फाटकालगत औद्योगिक विभागातील नवीन रस्त्याने येणाऱ्या वाहतुकीला सय्यदनगर-महंमदवाडी किंवा हांडेवाडी रस्त्यावर उजवीकडे वळता येणार नाही. (या वाहतुकीस फक्त डावीकडे वळून ससाणेनगरकडेच जावे लागेल.) महंमदवाडी, सय्यदनगर हा रस्ता रेल्वे फाटक क्रमांक सातकडे जाताना सुवर्णमंगल कार्यालयापासून पुढे रेल्वे फाटक क्रमांक सातपर्यंत एकेरी वाहतुकीचा राहील. रेल्वे फाटक क्रमांक सातपासून महंमदवाडी-सय्यदनगरकडे महंमदवाडी रस्त्याने जाता येणार नाही. सय्यदनगरहून येणाऱ्या वाहतुकीस रेल्व फाटक पार केल्यानंतर उजवीकडे वळून काळेपडळ बाहय़वळण मार्गाने व रेल्वे फाटक क्रमांक आठकडे जाता येणार नाही. ससाणेनगर रस्त्याने गणेश मंदिर चौकातून मागे वळून व ससाणेनगर येथून डावीकडे वळून काळेपडळकडे जाता येईल. काळेपडळ बाहय़वळण मार्गाने रेल्वे फाटक क्रमांक सातकडे जाणाऱ्या वाहतुकीस रेल्वे फाटक क्रमांक आठ येथून उजवीकडे वळून ससाणेनगर रस्त्यावर जाण्यास मनाई राहील.

वाहतुकीच्या या बदलाबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या ‘पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, साधू वासवानी रस्ता, पुणे १’ या पत्त्यावर ४ ऑगस्टपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकती यांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येतील, असे वाहतूक शाखेने कळविले आहे.

नाना पेठ भागात ‘नो पार्किंग’

समर्थ वाहतूक विभाग पुणेअंतर्गत नाना पेठ पोलीस चौकी ते घर क्रमांक ६०३ नाना पेठ मारुती मंदिर व धुंद दुकानापर्यंतचे सार्वजनिक बोळात नो पाìकग करण्यात येत आहे. नाना पेठ पोलीस चौकी डी. पी. ते चांदतारा मशिदीपर्यंत पी १, पी २ करण्यात येत आहे. विनय हायस्कूल कंपाऊंडला लागून २५ मीटपर्यंत नो पाìकग व विनय हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस (कासेवाडीकडे जाणाऱ्या लेनवर) रस्त्याच्या दोन्ही बाजूस २५ मीटर नो पार्किंग करण्यात येत आहे. या बाबतही नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.