तीस टन मासळी, हजारो किलो मटण आणि चिकन फस्त करुन सामिष खवय्यांकडून ‘आषाढाची ’ सांगता करण्यात आली. आषाढाच्या शेवटच्या दिवशी खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनला मोठी मागणी होती. शहरातील मटण, मासळी तसेच चिकन विक्री करणाऱ्या दुकानात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

व्रतवैकल्यांचा म्हणून ओळखला जाणाऱ्या श्रावण महिन्याचा प्रारंभ सोमवारपासून (२४ जुलै) होणार आहे. श्रावण महिन्यात सामिष पदार्थ वज्र्य केले जातात. त्यामुळे सामिष खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनला आषाढ महिन्यात मोठी मागणी असते. अनेक जण दसऱ्यानंतर सामिष पदार्थाचा आस्वाद घेतात. आषाढ महिन्याची सांगता अमावस्येला होते. आषाढ अमावस्येच्या दिवशी सामिष पदार्थावर ताव मारुन दुसऱ्या दिवशीपासून सामिष पदार्थाचे सेवन वज्र्य केले जाते. त्यामुळे आषाढ अमावस्येच्या दिवशी मटण, मासळी तसेच चिकनच्या मागणीत मोठी वाढ होते. आषाढ महिन्यातील शेवटच्या आठवडा असल्याने गेले चार दिवस मटण, मासळी, चिकनला खवय्यांकडून मोठी मागणी होती. गणेश पेठेतील मासळी बाजारासह शहराच्या विविध भागातील मटण, चिकनची विक्री करणाऱ्या दुकानांत रविवारी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे दृश्य पाहायला मिळाली. सकाळपासून खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने मासळीला मोठी मागणी होती. गणेश पेठतील मासळी बाजारात समुद्रातील मासळी पंधरा टन, खाडीतील मासळी पाचशे टन, आंध्रप्रदेशातून रहू, कतला, सिलन ही मासळी पंधरा टन अशी आवक मासळी बाजारात झाली. सर्व प्रकारच्या मासळीच्या दरात किलोमागे तीस ते चाळीस रुपयांनी वाढ झाली, अशी माहिती मासळी बाजारातील प्रमुख विक्रेते ठाकूर परदेशी यांनी दिली.

Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
After tutari is become Sharad Pawars NCP Election symbol trumpet players could not find work
तुतारीवाल्यांची झाली पंचाईत!

पुणे मटन दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले की, मटणाला चांगली मागणी होती. अमावस्या दुपारी चापर्यंत असल्याने अनेकांनी सकाळी शहरातील विविध मटण विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. मटणाचा भाव प्रतिकिलो चारशे चाळीस रुपये असा राहिला. गेले आठवडाभर चिकनच्या मागणीत वाढ झाली होती. हॉटेल व्यावसायिक तसेच किरकोळ ग्राहकांकडून चिकनला चांगली मागणी होती, असे रुपेश अ‍ॅग्रो ट्रेडर्सचे रुपेश परदेशी यांनी सांगितले.