दोन आरोपींना अटक

मोलमजुरी करणाऱ्या महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना धनकवडीतील शंकरमहाराज वसाहत परिसरात मंगळवारी ( ३० ऑगस्ट) मध्यरात्री घडली. सहकारनगर पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना पकडले.

Mumbai Crime Branch detained two suspects from Navi Mumbai
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोघांना गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक

नवनाथ राम जाधव (वय २०) आणि खंडू बापू लोंढे (वय ३२ दोघे रा. शंकरमहाराज वसाहत, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पीडित महिलेने यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही केटरिंग व्यावसायिकाकडे कामाला आहे. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ती कामावरुन घरी निघाली होती. आरोपी जाधव व लोंढे यांनी तिचा पाठलाग केला. महिलेच्या डोक्यात काठी मारली आणि शंकरमहाराज वसाहतीच्यालगत असलेल्या ज्ञानेश्वर सोसायटीच्या पार्किंगमध्ये नेले. महिलेला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केला. तिला मारहाण करुन दोघे जण पसार झाले. जखमी अवस्थेतील महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलीस हवालदार संजय भापकर यांना पसार झालेल्या आरोंपीची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, गुन्हे शाखेचे निरीक्षक अप्पासाहेब वाघमळे, सहायक निरीक्षक मोरे, संजय भापकर, सतीश चव्हाण, येवले, पन्हाळे, मोरे यांनी ही कारवाई केली.