एखाद्या गावची जत्रा किंवा उरूस म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते खेळणी, खाऊ यांचे गाळे, सेल्फी स्टिक्स, गॉगल यांचे फिरते विक्रेते.अगदी कानातल्यापासून मोबाइल कव्हपर्यंत आदी सर्व वस्तू मिळण्याचे ठिकाण.. असेच स्वरूप पिंपरीतील हिंदुस्तान अँटीबायोटिक्सच्या मैदानाला रविवारी प्राप्त झाले होते. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने साहित्य रसिकांपेक्षा तेथे बघ्यांची जत्रा अनुभवली.
कोटीच्या कोटी उड्डाणे करणाऱ्या पिंपरीतील अखिल भारतीय मराठी ‘खर्चिक’ संमेलनाला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष होते. उद्घाटनाच्या दिवशी आणि त्यानंतरही रसिक प्रेक्षकांसह तरुणाईने गर्दी केल्याने आयोजकांच्या जीवात जीव आला. सुट्टीचे औचित्य साधून संमेलनस्थळावर रविवारी प्रचंड गर्दी होती. संमेलन अनुभवण्यासाठी आलेल्यांपेक्षा पाहण्यासाठी आलेल्यांची गर्दीच अधिक होती. सभा मंडप, ग्रंथदालन यापेक्षाही बाहेरच गर्दी दिसत होती. सायंकाळी सहानंतर या बघ्यांच्या गर्दीने उच्चांक गाठला.
साहित्य नगरीमध्ये फेरफटका मारावा या उद्देशाने आलेल्या एखाद्या साहित्य रसिकाला वाट चुकलो की काय.. असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती ग्यानबा-तुकाराम साहित्य नगरीत होती. संमेलनस्थळावर गेल्या मुख्य प्रवेशद्वारावरच पहिली भेट होते ती गॉगल विक्रेत्याशी. तिथून पुढे गळ्यात अडकवायचे रंगीबेरंगी रुमाल विक्रेता दिसतो. प्रवेशद्वाराच्याच ठिकाणी खेळणी, फुगे, पिपाण्या, कानातले विकणारे फिरते विक्रेते .. या सगळ्या गर्दीतून आपण बरोबर पत्त्यावरच आलो आहोत याची खातरजमा करून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुरुवातीलाच खारे दाणे आणि लिमलेटच्या गोळ्यांची विक्री करणारा गाळा. सेल्फी स्टिक्स विक्रेत्यांची तर ‘दिवाळी’च होती. बघावे तिथे सुरू असलेले फोटो सेशन. पोलिसांची नजर चुकवून साहित्य नगरीत प्रवेश केलेला आणि गर्दीत मिसळून आपले काम शांतपणे करणारा भिकारीही. दुसऱ्या बाजूला खाण्याच्या पदार्थाच्या गाळ्यांवर असलेली मोठी गर्दी.. दोन मिनिटे एखाद्या ठिकाणी थांबल्यावर ‘कोणता पदार्थ छान आहे. याच्या कानावर पडणाऱ्या चर्चा. या सगळ्यातून ग्रंथदालनाचीही सुटका झाली नाही. ग्रंथदालनातही ‘भिंग, औषधी तेल, शोभेच्या वस्तू, टूलकिट, संगणक साफ करण्याची उपकरणे अशा वस्तूंच्या गाळ्यांवर गर्दी दिसत होती.
जत्रेत काय काय मिळत होते..
लिमलेटच्या गोळ्या, खारे दाणे, पाणीपुरी, कुल्फी, वडापाव असे खाद्यपदार्थ, पिपाण्या, गॉगल, रंगीबेरंगी रुमाल, सेल्फी स्टिक्स, कानातले, लहान मुलांची खेळणी, भिंग, औषधी तेल, शोभेच्या वस्तू, यंत्र दुरुस्तीची उपकरणे, संगणक स्वच्छ करण्याची उपकरणे आदी.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत