देवदर्शनावरून परतणाऱ्या दुचाकीस्वार दाम्पत्याला जीपने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे भागात सोमवारी सकाळी घडली. अपघातानंतर जीपचालक पसार झाला.

कुंदा सुदाम वर्पे (वय ४८) आणि सुदाम भिकाजी वर्पे (वय ५२, दोघेही रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रूक) अशी मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांकडून जीपचालक सैतानसिंग भाटी (वय २५) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सुदाम आणि त्यांची पत्नी कुंदा सोमवारी पहाटे जेजुरी येथे दर्शनासाठी गेले होते. जेजुरीहून ते परतत असताना बाह्यवळण मार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यावर विरूद्ध दिशेने आलेल्या जीपने दुचाकीस्वार वर्पे दाम्पत्याला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या वर्पे दाम्पत्याला नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने तातडीने रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर पसार झालेल्या जीपचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
baramati couple found dead marathi news
बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश