पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा नाकारल्यामुळे रुबी रुग्णालयात एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपुर्वी जन्मलेल्या अर्भकास ह्रदयविकाराची समस्या असल्याने खुंटे कुटुंबियांनी आपल्या अर्भकाला पुण्यातील प्रसिद्ध रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. नवजात बालकावर शस्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. या शस्रक्रियेसाठी रुग्णालय प्रशासनाने बाळाच्या कुटुंबियांना ३ लाख ५० हजार रुपये भरण्यास सांगितले होते. एवढी मोठी रक्कम एकाच वेळी भरण्याचे सांगताना रुग्णालयाने बालकाच्या कुटुंबियांना नव्या नोटांची अट घातली होती.

जुन्या नोटा व्यवहारातुन हद्दपार केल्यानंतर रुग्णालये, मेडिकल तसेच पेट्रोलपंप यासारख्या ठिकाणी जुन्या नोटा स्वाकार्ह असल्याचे सकारने आदेश दिले असताना रुबी रुग्णालयाने जुन्या नोटा घेण्यास नकार दिल्याचा आरोप बालकाच्या कुटुंबियांनी केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना खुंटे कुटुंबियांवर बालकाला गमावण्याची वेळ आली.
नोटाबंदीनंतर बऱ्याच ठिकाणी धनादेशाच्या माध्यमातून व्यवहार सुरु आहेत. हे लक्षात घेऊन खुंटे कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनाला धनादेश देण्याची देखील तयारी दाखवली होती. पण रुग्णालय प्रशासनाने धनादेश घेणे सुद्धा नाकारले अशी माहिती नोटांबंदीमुळे बालक गमावलेल्या कुटुंबियांनी दिली.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

यापूर्वी मुंबईतील एका रुग्णालयाच्या अडमुठेपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी सर्व रुग्णालयांनी उपचारासाठी दाखल झालेल्यांकडून जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले होते. पण सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार रुबी रुग्णालयाने केल्याचे दिसते.