अ‍ॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा पहिलाच मराठी कवी
‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून युवावर्गाच्या गळ्यातील ताईत झालेला लाडका कवी संदीप खरे आता ‘मोबाइल अ‍ॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अ‍ॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हा मराठीतील पहिलाच कवी ठरला आहे. आज, रविवारपासून हे अ‍ॅप कार्यान्वित होणार आहे.
‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलील कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीजनाही अपार लोकप्रियता लाभली आहे. सलग बारा वर्षे हाउसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हेदेखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे.
सीडी व्यवसायामुळे तसेच नव्या युगाची गरज म्हणून संदीप आता ‘डिजिटल’ स्वरूपात जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठीच ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी ‘संदीप खरे ऑफिशियल पेज’ या संदीपच्या सोशल पेजला इंटरनेटवर प्रचंड ‘लाइक्स’ मिळाले आहेत. हा प्रतिसाद पाहूनच या अ‍ॅपची कल्पना सुचली असल्याचे संदीप खरे याने सांगितले. मराठी साहित्यामध्ये कवीचे स्वत:चे वैयक्तिक अ‍ॅप ही कल्पना प्रथमच साकार होत आहे. सध्या ‘गुगल प्ले’वर उपलब्ध असलेले हे अ‍ॅप लवकरच ‘आय टय़ून’ आणि ‘अ‍ॅमॅझॉन’वरही उपलब्ध होणार आहे.

जेथे पुस्तके, सीडी पोहोचू शकत नाहीत आणि कार्यक्रमही जाऊ शकत नाही अशा ठिकाणीही जगभरात ही कविता आता पोहोचू शकेल.
– संदीप खरे, कवी

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
vaishali darekar s campaign, bjp mla ganpat gaikwad wife, bjp mla ganpat gaikwad wife to media,
मोदींसाठी भाजपचाच प्रचार करणार; आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची माहिती
Loksatta entertainment The movie Mahaparinirvana will release on December 6
‘महापरिनिर्वाण’ ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..