खुनाचा गुन्हा दाखल

मुंबई-बंगळुरू बाह्य़वळण मार्गावर बेदम मारहाणीत जखमी झालेल्या साताऱ्यातील हॉटेल व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सिंहगड पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात हॉटेल व्यावसायिकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मोटारचालकासह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अभयसिंह उर्फ आबा उत्तम गोडसे (वय ३५,रा. वडुज, ता. खटाव, जि. सातारा) असे खून झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालकासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. समीर अत्तार (वय २०,रा. वडूज, ता. खटाव, जि. सातारा) याने यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  गोडसे हॉटेल व्यावसाायिक आहेत. सहा ऑक्टोबर रोजी गोडसे आणि अत्तार पुण्यात आले होते. चायनीज खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या आचाऱ्याच्या शोधात ते सिंहगड रस्ता भागात आले होते. तेथून ते मोटारीतून रात्री नऊच्या सुमारास साताऱ्याकडे निघाले होते. बाह्य़वळण मार्गावर मोटार पुढे नेल्याच्या कारणावरून पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून आलेल्या पाच जणांनी त्यांना अडवले आणि गोडसे यांना लोखंडी गज, बांबूने बेदम मारहाण केली. मोटारीची काच फोडून पाच जण पसार झाले. त्यानंतर अत्तार गोडसे यांना घेऊन साताऱ्यात पोहोचले. तेथील एका रूग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सातारा पोलिसांकडून याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.याप्रकरणाचा तपास सिंहगड पोलिसांकडे सोपविण्यात आला होता.

Bloodshed because of professional competition in Gondia Sand businessman killed in firing
गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात; गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

सिंहगड पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. तपासात गोडसेंना बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन खोडदे तपास करत आहेत.