शहरातील गतिरोधक कसे तयार करावेत याबाबत महापालिकेचे स्वत:चे काही धोरण असणे तसेच गतिरोधक तयार करताना इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) निकषांप्रमाणे ते तयार करणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील नव्वद टक्के गतिरोधक हे आयआरसीच्या निकषांप्रमाणे नसल्याची वस्तुस्थिती समोर आली असून तशी स्पष्ट कबुलीच महापालिका प्रशासनाने दिली आहे.

सन २०१५ मध्ये शहरातील केवळ  ७५ गतिरोधक आयआरसीच्या निकषांप्रमाणे बनविण्यात आले होते, त्यानंतरही हेच चित्र कायम आहे. त्यामुळे महापालिकेने तयार केलेले गतिरोधकांबाबतचे धोरण केवळ कागदावर असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
What was the cause of the Rwandan genocide 30 years ago
१०० दिवसांत ८ लाखांची कत्तल…३० वर्षांपूर्वीच्या रवांडा नरसंहाराचे कारण काय होते? सद्यःस्थिती काय?
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

शहरातील गतिरोधक अशास्त्रीय असल्याने दीड वर्षांपूर्वी शहरातील काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती.   त्यानंतर महापालिकेने गतिरोधक तयार करण्यासंबंधीचे धोरण तयार करून त्यानुसार गतिरोधक तयार केले जातील असे जाहीर केले. मात्र, त्यानंतरही त्या धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही. मागणी तसा पुरवठा अशा पद्धतीने शहरात सर्वत्र गतिरोधक तयार करण्यात आले असून या अशास्त्रीय गतिरोधकांमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना निष्कारण त्रास होत आहे. महापालिकेकडून डांबर वापरून तसेच आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक अशा पद्धतीने गतिरोधक तयार केले जातात. मात्र त्यात कोणतीही सुसूत्रता नाही. अनेक ठिकाणी नगरसेवकांच्या आग्रहास्तव गतिरोधक तयार करण्यात आले आहेत.

अशास्त्रीय गतिरोधकांमुळे पुणेकर त्रस्त

वाहनांचा वेग कमी करण्याच्या उद्देशाने बसविण्यात आलेले शहरातील बहुतांशी गतिरोधक हे अशास्त्रीय पद्धतीने बसविण्यात आल्याने नागरिकांचे शारीरिक नुकसान होत आहेच, त्याचबरोबर वाहनांचेही नुकसान होत आहे. दोन गतिरोधकांमध्ये किती अंतर असावे, पुढे गतिरोधक आहे असा सूचना फलक कुठे असावा, गतिरोधक लक्षात येण्यासाठी पांढरे-पिवळे पट्टे कशा पद्धतीचे असावेत, रस्त्यावर किती आणि कुठे गतिरोधक असावेत याबाबत कोणतेही धोरण शहरात अस्तित्वात असल्याचे दिसत नाही.

नियमावली सांगते..

आयआरसीच्या नियमानुसार गतिरोधकाची उंची दहा सेंटिमीटर, लांबी साडेतीन मीटर आणि वर्तुळाकार क्षेत्र सतरा मीटर असणे आवश्यक आहे. तसेच वाहनचालकांना गतिरोधक असल्याची सूचना मिळण्यासाठी चाळीस मीटर अंतरावर सूचना फलक असावा, असाही नियम आहे. गतिरोधक तयार करताना वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच गतिरोधकावर थर्मोप्लॅस्टिक पेंटने तयार केलेल्या पट्टय़ा असाव्यात, गतिरोधकाचा उद्देश वाहनाचा वेग वीस ते तीस किलोमीटर प्रतितास कमी करणे हा असावा, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ताच्या पाहणीत काय दिसले..

  • शहरात बहुतांशी ठिकाणी रबरी स्ट्रीपचे गतिरोधक आहेत. त्यातील अनेक ठिकाणचे रबर गेल्याने खिळे वर आले आहेत.
  • डांबरी गतिरोधकांची उंची, लांबी आणि क्षेत्रफळ यांच्या निकषांचे पालन केले जात नसून अनेक रस्त्यांवरील पांढरे, पिवळे पट्टे पुसट झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे पट्टे दिसून येत नाहीत.
  • सिंहगड रस्ता, िहगणे, आनंदनगर, सनसिटी, नऱ्हे, आंबेगाव, धायरी, वडगाव बुद्रुक येथील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील बहुतांश गतिरोधक कमी-अधिक उंचीचे आहेत. जेथे गरज नाही, तेथे गतिरोधक तयार करण्यात आले आहेत.
  • औंध रस्ता, विद्यापीठ रस्ता, सेनापती बापट रस्ता, सातारा रस्ता, कर्वे रस्ता यांच्यासह मध्यभागातील अनेक रस्त्यांवर अनेक गतिरोधक आहेत. अनेक ठिकाणचे गतिरोधक काढण्यात आले आहेत, परंतु तेथे रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही.
  • गतिरोध करणाऱ्या पांढऱ्या पट्टय़ा (रम्बलिंग स्ट्रीप) रस्त्यांवर मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे आणि नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे.

शहरात गतिरोधक तयार करताना आयआरसीबरोबरच स्थानिक गरजेनुसार गतिरोधक तयार करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यानुसारच गतिरोधक तयार करण्यात आले असल्याने शहरांतील विविध भागांत वेगवेगळ्या प्रकारचे गतिरोधक दिसून येतात. स्पीड टेबल, स्पीड हंब, बिटुमन अशा प्रकारचे गतिरोधक संबंधित रस्त्यांवरील वाहतूक, रस्त्याची लांबी-रुंदी यांनुसार बनविण्यात आले आहेत.

राजेंद्र राऊत, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका