सातवा वेतन आयोग आणि बोनसच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीत गावाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पिंपरी चिंचवडमधील वल्लभ नगर डेपोमधले २५० कर्मचारी संपावर आहेत. एस.टी. सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मध्यरात्रीपासून डेपोतून एकही गाडी सुटलेली नाही त्यामुळे प्रवासी बस स्टँडवर ताटकळले आहेत.

वल्लभ नगर बस डेपोतून दोनशे ते अडीचशे बस दररोज राज्यातील विविध ठिकाणी जाण्यासाठी सुटतात. मात्र या सगळ्या बसेस आज जागेवरच उभ्या आहेत. या संपामुळे प्रवासी वैतागले तर आहेतच शिवाय त्यांचे अतोनात हालही होत आहेत. बस सेवा ठप्प झाल्याने बस स्थानकात गर्दी झाली आहे,तर काही प्रवासी परत जात आहेत.त्यामुळे बस कर्मचारी संप मागे कधी घेणार हा प्रश्न कायम आहे. तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही सकारात्मक निर्णय घेतील का? याकडेच या बस कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
Ship catches fire in Thailand all passengers safe
थायलंडमध्ये जहाजाला आग, सर्व प्रवासी सुखरूप
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद