वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारल्यानंतर आज दिवसभरात एसटी कर्मचारी आणि प्रशासनातील वादामुळे ठिकठिकाणी परिस्थिती चिघळताना दिसली. कर्मचारी संघटना आणि एसटी प्रशासन आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत या वादावर कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र, त्यामुळे राज्यभरात प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. कर्मचारी संघटनांना अद्दल घडवण्यासाठी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एसटीच्या प्रवाशांसाठी आता थेट खासगी बस रस्त्यावर उतरवल्या आहेत. यामुळे काही काळ एसटी कर्मचारी आणि प्रशासनात वाद निर्माण झाले होते. मात्र, प्रवाशांची सोय झाल्याने आता ठिकठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

काही वेळापूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस डेपोत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी २०० खासगी बस आणल्या. मात्र, संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी या बस आगारातून बाहेर काढल्या. पुण्यात एसटी सेवेअभावी प्रवाशांचे खूप हाल होत होते. शिवाजी नगर बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळेच एसटी ऐवजी खासगी बस रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. मात्र, यामुळे स्वारगेट डेपोत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मुंबईत प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाने आतापर्यंत २०१८ खाजगी बसेस सोडल्या आहेत.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

तिजोरीत पैसेच नाहीत, २५ वर्षे सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही – दिवाकर रावते

आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी असे संघर्षाचे प्रसंग पाहायला मिळाले. बसस्थानक व आगारांमध्ये वाहनांचे नुकसान होऊ नये, कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडविले जाऊ नये यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच, सर्व एसटी आगार व स्थानकांमध्ये होणाऱ्या सर्व घटनांचे चित्रि‌‌करणही करण्यात येणार आहे. मात्र, तरीही आज सकाळी कागलमध्ये एसटीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी चालकालाही मारहाण करण्यात आल्याचे समजते. कोकण, अकोला, सांगली, मुंबई, यवतमाळ, नाशिक, कल्याण अशा अनेक ठिकाणी संपामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.