पुणे मेट्रोच्या मार्गातील अडथळा अखेर दूर झाला आहे. हरित लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली असून या निर्णयामुळे नदीपात्रातील मेट्रोच्या मार्गातील काम सुरु करता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वाजत गाजत शुभारंभ झालेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम थांबावे याकरिता अंतरिम स्थगिती देण्यात आली होती. पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्ग काम सुरू करण्यात येऊ नये यासाठी सारंग यादवाडकर यांनी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाने पुणे मेट्रोचे काम सुरू करण्यास अंतरिम स्थगिती दिली आहे. नदीपात्रामधून मेट्रोचा मार्ग जाऊ नये यासंदर्भात यादवाडकर यांनी मे महिन्यात याचिका दाखल केली होती.

Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Gokhale Bridge
गोखले पुलाचे ढिसाळ नियोजन, निवृत्त अधिकाऱ्याला पालिकेच्या पायघड्या
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

पुणे मेट्रोच्या ब्लू आणि रेड लाइनवर तांत्रिक अडचणी आहेत. हे मार्ग नदीपात्रावरुन जातात. यामुळेच सारंग यादवाडकर यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे पर्यावरण हितरक्षण याचिका दाखल केली होती. हरित लवादाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने हरित लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ३१.२५ किमीची मार्ग तयार केला जाणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पामध्ये १७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. पुणे मेट्रो २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुण्यातील पहिली मेट्रो लाइन पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशी असणार आहे. ही लाइन १६.६ किमी ची असून एकूण १५ स्टेशन असणार आहेत. ५ किमीची लाइन ही भुयारी मार्ग असणार आहे तर ९ किमीचा मार्ग हा उन्नत ( इलेव्हेटेड) मार्ग असणार आहे. तर, वनाज ते रामवाडी हा मार्ग १६ स्टेशन्सचा असून सर्व पूर्ण मार्ग हा उन्नत मार्ग आहे. या मार्गाची लांबी १४.९३ किमी असणार आहे.