शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक भागात पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या तिघांना पोलिसांना अटक केली. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलिसांकडून शोध घेण्यात आहे.

अतुल नामदेव घुले (वय ३०), रितेश अजय पवार (वय १९), दिवाकर सुरेंदर सिंग (वय २१, तिघेही रा. बोपखेल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अर्जुन वसंत देवकर (वय २८, रा. शुक्रवार पेठ) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. देवकर याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी शशिकांत घुले, सोन्या धावडे, अमोल गिरी, दिनेश धावडे, चंद्रकांत नवले, पप्पी शिर्के यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संग्राम यशवंत खामकर (रा. शुक्रवार पेठ) याने यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Sangli, Police, Raid Gutkha Factory, near kupwad, Seize Goods Worth 20 Lakhs, Detain 7, Sangli Raid Gutkha Factory, Gutkha Factory in kupwad, crime in sangli, marathi news,
सांगली : कुपवाडमध्ये गुटखा कारखान्यावर धाड, २० लाखाचा माल जप्त, ७ जण ताब्यात
in nagpur Suicide attempt by young man due to family reasons police save him
कौटुंबिक कारणातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण देवदुतासारखे धावून आले पोलीस; दरवाजा तोडून…
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

देवकर याने सन २०१० मध्ये राकेश घुलेचा हिंजवडी भागात खून केला होता. घुले खूनप्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर देवकर शुक्रवार पेठेत राहायला आला होता. घुलेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी कट रचला होता. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास शुक्रवार पेठेतील शाहू चौकातील पॉप्युलर हाइट्स इमारतीसमोर देवकर त्याचा आतेभाऊ खामकर आणि मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी घुले, पवार, सिंग, धावडे, गिरी, नवले, शिर्के तेथे आले. त्यांनी देवकरवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या देवकरला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली.

आरोपी पवार, घुले, सिंग यांना रात्री पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने तिघांना २९ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या देवकरच्या शरीरात शिरलेल्या दोन गोळ्या शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आल्या आहेत. पसार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के तपास करत आहेत.