मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले. संदीप पवार, उमेश बाबा नायकवडे आणि तानाजी पांडुरंग नायकवडे अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. बस चालक दिनेश कोळसे याची प्रकृतीही चिंताजनक आहे. त्याच्यासह एकूण सातजण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लच प्लेट खराब झाल्याने ‘एम एच ४३-एच ३५३६’ या क्रमांकाची बस सर्व्हिस रोडवर उभी होती. त्यातील काही प्रवासी बसच्या मागे थांबले होते. त्याचवेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या ‘टी.एन. ८८ ‘ क्रमांकाच्या ट्रकने या बसला जोरदार धडक दिली. ज्यामुळे मागे उभ्या असलेल्या तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. बस चालकाच्या डोक्याला मार लागला आहे. तर ट्रक चालकाच्या पायाला दुखापत झाली. या सगळ्याना निगडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात
accident on Jat- Kavthemahankal road 5 dead and 5 serious injured
जत- कवठेमहांकाळ मार्गावर अपघात; ५ ठार, ५ गंभीर
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
navi mumbai, palm beach road
नवी मुंबई: पामबीच मार्गावर वाहतूक संथगतीने

जखमींची नावे खालीप्रमाणे
१)श्रीपती गणपती पवार (वय ६०)
२)प्रवीण काशिनाथ नायकवडे (वय २४)
3)हिंदुराव दगडू नायकवडे (वय ४८)
४)प्रथमेश सुभाष शिंदे (वय १४)
५)बाबाजी पांडुरंग नायकवडे (वय ४२)
६)अहुब बाबू (ट्रक चालक) (वय ३८) चेन्नई
७)दिनेश किसन कोळसे (वय २३)