लग्नसराईच्या हंगामाचा फटका आळंदीकरांनी वेळोवेळी घेतला आहे, त्याचीच पुनरावृत्ती बुधवारी दिसून 27trafic1आली. आळंदीत येणाऱ्या आणि आळंदीतून बाहेर जाणाऱ्या  मार्गावर दुपारी वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. तीन तासाहून अधिक काळ झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले.
आळंदीत मोठय़ा प्रमाणात लग्नसोहळे होतात. माउलींचे दर्शन आणि लग्नसोहळ्यांना हजेरी, अशा दुहेरी हेतूने राज्यभरातून नागरिक या ठिकाणी मोठय़ा संख्येने येतात. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. विवाह मुहूर्त असलेल्या दिवशी आळंदीतील गर्दी नेहमीच्या तुलनेत वाढते. बुधवारी त्याचा प्रत्यय आला. मुहूर्ताचा दिवस असल्याने सकाळपासून आळंदीकडे वाहनांचा ओघ सुरू होता. दुपारनंतर, वाहतुकीच्या कोंडीचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला. आळंदीत येताना आणि जातानाच्या मार्गावर एकाच वेळी वाहनांची गर्दी होत गेली. काही वेळातच वाहतुकीचा खोळंबा झाला. जवळपास तीन तास नागरिकांना अडकून पडावे लागले. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नेहमीची डोकेदुखी
मंगल कार्यालयांमुळे लग्नांचे मुहूर्त असणाऱ्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडीचा अनुभव िपपरी-चिंचवडकरांना नवीन नाही. भोसरी, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव या भागातही असेच अनुभव नियमितपणे येतात. िहजवडीत मुळातच वाहतूक कोंडीची समस्या जटिल आहे, त्यात मंगल कार्यालयांमुळे भरच पडते. दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण केलेल्या या नेहमीच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.