21 September 2017

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये ३ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण, गुन्हा दाखल

पिंपळे गुरव येथील धक्कादायक घटना

पिंपरी-चिंचवड | Updated: September 14, 2017 8:43 AM

पिंपळे गुरव येथे खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने देव कशप या तीन वर्षांच्या विद्यार्थ्याला लाकडी पट्टीने मारहाण केली. (प्रातिनिधीक छायाचित्र)

गुडगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेतील प्रद्युम्न ठाकूर याची गेल्या आठवड्यात हत्या झाली. या घटनेमुळे पालकांच्या मनात मुलांच्या शिक्षण संस्थेबद्दल धास्ती निर्माण झाली आहे. ही घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये एका शिक्षिकेने खेळ गटातील तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देव कश्यप असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरा सांगवी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. भाग्यश्री पिल्ले असे या शिक्षिकेचे नाव आहे. बाल संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे एका शिक्षिकेने देव कश्यप या तीन वर्षांच्या विद्यार्थ्याला लाकडी पट्टीने मारहाण केली. यात हा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. शिक्षिकेविरुद्ध तक्रार करण्यासाठी मुलाची आई लक्ष्मी कश्यप आणि वडील सांगवी पोलिसांत गेले होते. मात्र सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. शिक्षिकेनं लाकडी पट्टीने देवच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर जबर मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. तीन दिवसांपूर्वी मारहाण केलेली सूज अद्याप उतरलेली नाही. मुलाची अवस्था पाहून कुटुंबीय घाबरले आहेत.

या प्रकरणी माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.

First Published on September 13, 2017 8:12 pm

Web Title: tuition teacher beaten 3 years student in pimpri chinchwad
 1. R
  RaviRaj
  Sep 15, 2017 at 11:09 am
  shikshak he gharcha rag mulanvar kadatat te swatala khup shahane samj
  Reply
  1. N
   Neelam Sanglikar
   Sep 14, 2017 at 8:03 pm
   लोकसत्ताने "देव संतोष कशाप्पा"चा फोटो दिला असता तर पिल्ले शिक्षिकेने किती क्रूरतेने डोळ्यांवर मारहाण केली हे वाचकांच्या लक्षात आले असते. संपूर्ण पिल्ले कुटुंबियांना पुण्यात अटक करून हाकलून द्या. गरिबी हाच गुन्हा ठरला का ? मुलाची दृष्टी गेली तर कोण जबाबदार ? एका दुष्ट बाईने चिमुकला आणि त्याच्या निर्धन आई-वडिलांचे आयुष्य उध्वस्त केले याबद्दल शासन काय करणार ?
   Reply
   1. A
    Ameya
    Sep 14, 2017 at 1:23 pm
    आपल्याकडे पोलीस खात्यात आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे, अनेक वेळा पोलीस हे जोपर्यंत दबाव येत नाही तोपर्यंत गुन्हा देखील दाखल करून घेत नाहीत. सद् रक्षणाय वगैरे गोष्टी फक्त नावापुरत्याच आहेत. वास्तविकतः गुन्हगारांना पोलिसांचे भय वाटले पाहिजे, पण आपल्याकडे परिस्थिती उलटी आहे, निरपराध सामान्य जनताच पोलिसांना वचकून असते, गुन्हेगार नाही.
    Reply
    1. b
     bhushanmore1983
     Sep 14, 2017 at 10:34 am
     इथे शाळेचा उल्लेख जाणून बुजून करण्यात आलेला दिसत नाही . कदाचित शाळा हि कुण्या राजकारणीय व्यक्ती ची असू शकेन. अशा बातम्या मुले लोकसत्ता ची विश्वस्ता कमी होतेय हे जाणून घ्यावे.
     Reply
     1. A
      Arun
      Sep 14, 2017 at 10:13 am
      आजपर्यंत अश्या गुन्ह्यात आरोप दाखल केलेल्या शिक्षकांना किती शिक्षा मिळाल्या त्यासुद्धा मीडियाने कधी वाचकांना सांगाव्यात. मुळात कायदे असूनही शिक्षा मामुली होतात म्हणूनच समाजात कायदे तोडून वागणा-यांचे फावते आणि गुन्हे वाढतंच चालले आहेत.
      Reply
      1. N
       Naresh Choudekar
       Sep 14, 2017 at 9:50 am
       अश्या राक्षसी लोकांना आता आपण, पालकांनीच शिक्षा करायला हवी असा वाटतंय... सर्व साधारण, गरीब, middle क्लास आणि व्हाईट कॉलर लोकांना पोलीस हि मदत करत नाहीत. त्यांना फक्त पैसे कोठून काढतायेतील ह्यातच इंटरेस्ट असतो. एवढ्या कोवळ्या पोराला मारून काय मिळवलं ह्या (सो कॉल्ड !) शिक्षिकेने?? अश्या लोकांना ना देवाचा, ना शासनाचा धाक राहिला आहे. आता आपण पालकांनीच आपल्या मुलांनसाठी जागृत, जागरूक आणि संगठीत होण्याची वेळ आली आहे... रायन स्कूल चा उधाहरण आपल्या डोळ्या समोर आहेच......
       Reply
       1. J
        jayant
        Sep 14, 2017 at 9:03 am
        कुठलातरी राग पिल्लेने या छोट्या मुलावर काढला . हिला काढून टाकायला हवे
        Reply
        1. Load More Comments