खडकी ते देहूरोड दरम्यान दोन वेगवेगळ्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना मध्यरात्री घडल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आकुर्डी ते देहूरोड दरम्यान धावत्या रेल्वेमधून पडल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री घडल्याचा अंदाज रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, रेल्वेगाडी कोणती होती हे समजू शकले नाही. मृतदेह उचलण्यासाठी कोणी नसल्याने शेवटी कर्दाळे या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह बाजूला काढला. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. अपघातात मृत व्यक्तीचा चेहरा हा विद्रुप झाला असून त्याचे वय ४५ आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

तर, दुसऱ्या अपघातात कासारवाडी येथे रात्री एकच्या सुमारास ग्वाल्हेर एक्सप्रेसची एकाला धडक बसल्याने मृत्यू झाला. या अपघातात इसमाच्या डोक्याला जबर मार लागला होता. मृत व्यक्तीच्या अंगात आकाशी रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर पांढ-या रंगाच्या पट्ट्या आहेत. काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आहे तर उजव्या हाताच्या मनगटावर ओम गोंदले आहे. या इसमाची ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तीचे वय हे ४० असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

lawrence bishnoi
अधोविश्व : पंजाब ते कॅनडा… बिष्णोई टोळीची दहशत
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”