लोहगाव (पुणे) येथील फॉरेस्ट पार्क जवळ असणाऱ्या खड्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा तपास विमानतळ पोलीस करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील फॉरेस्ट पार्क शेजारी असणाऱ्या खड्यात चार युवक पोहण्यासाठी गेले होते. त्यातील तिघे पाण्यात उतरले. त्याच्यातील अक्षय अरुण चिंचोळकर (वय २५, रा. खांदवेनगर, लोहगाव) आणि रवींद्र पोपट घडशी (वय २६, रा. चंदननगर) हे दोघे पोहत पुढे गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या चौघांनी मद्य प्राशन केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी तपास केला जात असल्याची माहिती विमानतळ पोलिसांनी दिली.

Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
bullock cart youth death marathi news
सांगली: शर्यतीवेळी बैलगाड्याच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार