वैष्णवपंथ हा कुठल्याही एका जाती, धर्मापुरता मर्यादित नाही. धर्मनीती व राजनीती एकत्र चालली, तर राष्ट्र मजबूत बनते, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामदास लहवितकर महाराज यांनी िपपरीत व्यक्त केले.

िपपरी महापालिकेच्या वतीने महापौर शकुंतला धराडे व आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते डॉ. लहवितकर यांना मानपत्र देण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. नंदा ताकवणे, स्वाती साने, गीता मंचरकर, आशा सूर्यवंशी, शैलजा शितोळे, सुलभा उबाळे या पालिका पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक राजेंद्र जगताप, नाना काटे, अप्पा बागल, विजय जगताप आदी उपस्थित होते. इतर कोणत्याही सन्मानापेक्षा महापालिकेने दिलेले मानपत्र मोठे असल्याचे सांगून डॉ. लहवितकर म्हणाले, की देहू-आळंदी या दोन क्षेत्रांमुळे माझे आध्यात्मिक क्षेत्रात पर्दापण झाले. वारकरी संप्रदायाचा विचार देशाविदेशात जाऊन पोहोचला आहे. संत तुकाराम महाराज यांचा विचार राष्ट्रधर्माचा विचार आहे. सर्वानी महाराष्ट्राची संस्कृती जपावी. आयुक्त वाघमारे म्हणाले, भारताच्या प्रगतीसाठी संतांचे महत्त्वाचे योगदान आहे. संतांनी समाज सुधारण्यासाठी व अस्पृश्यता निर्मूलनासाठी महान कार्य केले आहे. त्याचे स्मरण आपण सदैव करायला हवे. महापौर धराडे म्हणाल्या, की कुठलीही आशा न बाळगता संत समाजप्रबोधनाचे कार्य करीत असतात. त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यायला हवा. या वेळी राजेंद्र जगताप, सुलभा उबाळे, अप्पा बागल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक किशोर केदारी यांनी केले.