वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित करण्यात येणारी ‘वसंत व्याख्यानमाला’ यंदा २१ एप्रिल ते २० मे या कालावधीत टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. व्याख्यानमालेसाठीच्या प्रवेशिका टिळक स्मारक मंदिर येथे उपलब्ध आहेत.
व्याख्यानमालेचे उद्घाटन २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्या ‘वैद्यकीय क्षेत्रातील गेल्या अर्धशतकातील बदल’ या विषयावरील व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरुवात होईल. व्याख्यानमालेत डॉ. हमीद दाभोलकर यांचे ‘विवेक दाखवी आम्हा वाट’, डॉ. सदानंद मोरे यांचे ‘गीतारहस्य’, पाशा पटेल यांचे ‘शेतीचे अर्थकारण’ या विषयांवर व्याख्यान होणार आहे. या शिवाय अभिनेते सुबोध भावे, हर्षवर्धन पाटील आदीं वक्तयांचीही व्याख्याने होणार आहेत.