खडकवासला धरण १०० टक्के भरले असून त्यातून आज दुपारी दोन वाजता १३ हजार ९८१ क्युसेक पाणी कालव्यात सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग सुरु होताच मुठा नदी दुथडी भरुन वाहून लागली. भिडे पुलाजवळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पुलावर पाच गाड्या अडकल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांत आठवड्याभरापासून संततधार पावसामुळे कमालीची वाढ होत आहे. या चारही धरणांत मिळून १९.१४ टिएमसी (६५ टक्के) इतका पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली.

water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
ow pressure water supply
दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. यंदा सततच्या पावसामुळे पाणी साठ्यात चांगल्या प्रकारे वाढ होत असून यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. तर टेमघर धरणात सर्वाधिक १६२ मिमी पाऊस झाला आहे. त्याचबरोबर अजूनही धरण क्षेत्रात पाऊस सुरुच आहे. आज दुपारी १२ वाजता ९ हजार ४१६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कालव्यात सोडण्यात आला. नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

धरण           आजचा पाऊस     टिएमसी      पाण्याची टक्केवारी
खडकवासला         ३६            १.९७     १००
पानशेत             १२०         ८.६६     ८१.३४
वरसगाव            ११८          ७.०६      ५५.०५
टेमघर              १६२           १.४५      ३९.२०