शस्त्रसाठा जप्त

ससून रुग्णालयाच्या आवारात गुंडासह त्याच्या साथीदारांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून मोटार, कोयते, बेसबॉल स्टिक असा माल जप्त करण्यात आला. शनिवारी (२२ ऑक्टोबर) ही घटना घडली.

Rat case Sassoon hospital, Rat case,
ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात दोषी कोण? अखेर सत्य येणार बाहेर
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत
drug dealer died because of heart attack after seeing the police
पुणे : पोलिसांना पाहताच अमली पदार्थ विक्रेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

श्रीनाथ उर्फ शेरु विलास परदेशी (वय ३३), कमलाकर विलास काकडे (वय २३), किरण शिवाजी शेडगे (वय १९), हर्षद मनोहर गुजर (वय २५,चौघे रा. शिवाजीनगर गावठाण)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शेरु परदेशीने तीन वर्षांपूर्वी शिवाजीनगर गावठाणमधील वर्चस्वाच्या वादातून माऊली शिंदेंचा खून केला होता. या गुन्ह्य़ात पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली होती. परदेशीने खूनप्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळवला. तो कारागृहातून बाहेर पडला. दरम्यान, माउली शिंदेचा मित्र गुंड श्वेतांग निकाळजेकडून जिवाला धोका असल्याने परदेशीने शस्त्र बाळगण्यास सुरुवात केली होती.

उरळी कांचन भागातील गुंड अप्पा लोंढे याच्या खूनप्रकरणात अटकेत असलेला गुंड गोरख कानकाटे सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. कानकाटेला ससून रुग्णालयात भेटण्यासाठी परदेशी साथीदारांसोबत येणार आहे, तसेच त्यांच्याकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रदीप सुर्वे यांना मिळाली. शनिवारी ससून रुग्णालयाच्या आवारात पोलिसांनी सापळा लावून परदेशीसह त्याच्या साथीदारांना पकडले. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक एम.एम.मुजावर, सहायक निरीक्षक महादेव वाघमोडे, युवराज नांद्रे, प्रदीप सुर्वे, लक्ष्मण शिंदे, सुधीर मनोळकर, शिवाजी घुले, अजय खराडे,प्रदीप शितोळे, अमजद पठाण, सचिन घोलप, गणेश बाजारे, नामदेव अंगज, संजय दळवी यांनी ही कारवाई केली.