पुण्यातील कर्वेनगर येथे सोमवारी रात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली. गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन ही हत्या केली असून अद्याप मृत तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

सोमवारी संध्याकाळी कर्वेनगरमधील मावळे आळी येथील एका खोलीमध्ये २५ ते २७ या वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे नागरिकांनी पाहिले. यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. प्राथमिक तपासात गळ्यावर वार करुन ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून वारजे पोलीस घटनेचा तपास करत आहे. अज्ञात व्यक्तींविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’