[content_full]

विनय आणि विनयाचं सकाळी भांडण झालं, तेव्हापासून दोघांमध्ये अबोला होता. एरव्ही घरी समोरासमोर असतानाही एकमेकांशी चॅट करण्याची संधी न सोडणारे ते दोघं, पण आज दुपार होत आली, तरी त्यांनी एकमेकांना पिंगसुद्धा केलं नव्हतं. `आज डब्यात कुठली भाजी आहे,` हे जाताना त्यानं विचारलं नव्हतं, की `भाजी आवडली की नाही,` हे तिनं विचारलं नव्हतं. एरव्ही दुपारी जेवणाच्या सुटीत हा फोन किंवा एक मेसेज तरी ठरलेला असायचाच. आज मात्र परिस्थिती फारच गंभीर होती. नेमकं कशावरून भांडण झालं, ते दोघांनाही आठवत नव्हतं. तिनं त्याच्यासाठी गरम पाणी लावलं नाही, म्हणून त्याला राग आला होता, किंवा ती त्याच्याशी कालच्या शॉपिंगमधलं सांगत असताना तो बहुधा मोबाईलमध्ये आलेल्या जोकवर हसला होता. यापैकीच काहीतरी गंभीर घडलं होतं, पण काय, त्याचा छडा लावणं आवश्यक होतं. कारण त्यावरच आधी माघार कोण घेणार, हे ठरणार होतं. दुपारची जेवणाची सुटी संपत आली, तशी दोघांचीही अस्वस्थता वाढली. मोबाईल हातात घ्यावा की घेऊ नये, याची चुळबूळ सुरू झाली. त्याला तिला मेसेस करावासा वाटत होता, तिलाही त्याच्याशी बोलावंसं वाटत होतं. पण पहिल्यांदा पुढाकार कोण घेणार, हे ठरत नव्हतं. कारण ज्यानं पुढाकार घेतलाय, त्यानंच माघार घेतली असल्याचं स्पष्ट होतं. आणि तिथेच नेमका इगो आड येत होता. संध्याकाळपर्यंत काही घडलंच नाही. कामातही दोघांचं लक्ष लागलं नाही. तो आज जरा ठरवूनच उशिरा घरी आला. तिला पाठवण्यासाठी त्यानं प्रवासातच एक भला मोठा मेसेज टाइप करून ठेवला होता. `आता बास झालं, आपण थांबूया,` असा त्याचा आशय होता. तो घरात शिरला आणि भाजणीचा खमंग वास त्याच्या नाकात शिरला. तिनं त्याच्या आवडीची थालीपीठाच्या भाजणीची उकडपेंडी केली होती. त्याचं वैराग्य तिथेच खलास झालं आणि तिलाही खुदकन हसू आलं.

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
Gold Silver Price
Gold-Silver Price on 9 April 2024: गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, पाहा आजचा भाव
Gold Silver Price on 25 March 2024
Gold-Silver Price on 25 March 2024: रंगपंचमीच्या दिवशी सोन्याच्या दरात बदल, चांदीही चमकली; वाचा आजचे दर
Gold Silver Price on 24 March 2024
Gold-Silver Price on 24 March 2024: होळीच्या दिवशी सोने-चांदी किमतीत झाला मोठा बदल, आता १० ग्रॅमचा ‘हा’ आहे दर

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • एक वाटी भाजणीचे पीठ
  • दोन वाट्या आंबट ताक
  • आल्याचा बोटभर तुकडा
  • ४- ५ लसणाच्या पाकळ्या
  • एक लहान कांदा बारीक चिरून
  • २-३ हिरव्या मिरच्यांचा ठेचा
  • चवीनुसार मीठ
  • चवीसाठी चिमूटभर साखर
  • एक छोटा चमचा जिरेपूड
  • फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग व चिमूटभर हळद
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ५-६ कढीपत्त्याची पाने

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • भाजणीच्या पिठात ताक मिसळून चांगले कालवून घ्यावे, गाठी राहता कामा नयेत.
  • त्यातच आले-लसणाची पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ व साखर घालून पीठ चांगले कालवून घ्यावे.
  • गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हळद व हिंग घालून फोडणी करावी.
  • कांदा खरपूस परतून घ्यावा. नंतर कालवलेले पीठ घालावे.
  • मंद आचेवर हे मिश्रण झाकण ठेवून शिजू द्यावे. वाफेवर शिजल्याने उकडपेंडी चांगली मोकळी होते.
  • मधूनमधून हलवत रहावे. शिजली की गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

[/one_third]

[/row]