[content_full]

काही पदार्थ आपल्या विशेष जिव्हाळ्याचे असतात. लहानपणापासून आपली त्यांच्याशी ओळख असते, सलगी असते. सतत कानावर हा पदार्थ पडलेला असतो. त्याविषयी आपल्याला नाही, तरी आपल्या जवळच्या वडीलाधाऱ्यांना विशेष आस्था असते. अशाच पदार्थांपैकी एक, म्हणजे रगडा पॅटीस. माणसाची जशी माकडापासून उत्क्रांती झाली म्हणतात, तशी या पदार्थाची एका पदार्थापासून उत्क्रांती झाली आहे, तो म्हणजे धम्मक लाडू किंवा चापट पोळी. काळ बदलला, तसे हे पदार्थही जुने वाटायला लागले. त्यांनी आधुनिक रूपडं धारण करणं अनिवार्य होतं. फोडणीची पोळी, फोडणीचा भात, कांदा पोहे, दही-दूध पोह्यांवरून आपण एसपीडीपी, कट डोसा, कच्छी दाबेली, पाणीपुरीकडे वळू लागलो, तसंच धम्मक लाडूवरून रगडा पॅटीसचा टप्पा गाठणं ही काळाची गरज होती. हे सगळं वर्णन कशाबद्दल चाललंय, हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेलच. तर, `पाठीत रगडा पॅटीस देऊ का,` हे वाक्य उच्चारणं हा प्रत्येक मोठ्या भावंडाचा, पालकांचा हक्क आहे आणि ते ऐकायला लागणं हे प्रत्येक धाकट्या अपत्याच्या वाट्याला आलेले भोग आहेत. ते भोगल्याशिवाय मोठेपणी प्रत्यक्ष रगडा पॅटीसच्या गरमागरम डिशपर्यंत पोहोचता येत नाही, असं म्हटलं जातं. बरं, पाठीतलं रगडा पॅटीस जसं कधीही, कुठल्याही कारणासाठी मिळू शकतं, तसंच खायचं रगडा पॅटीसही कधीही, कुठल्याही कारणाशिवाय ग्रहण करावं, त्यात खरी मजा आहे. दमूनभागून घरी आलेलो असताना, `आज मला घरात प्रचंड काम आहे,` हे तासाभरापूर्वीच फोनवर ऐकायला लागलेलं असताना, अचानक बायकोनं समोर रगडा पॅटीसची वाफाळती डिश समोर आणून ठेवण्यासारखं दुसरं सुख नाही! धोक्याचा इशाराः दिवसाउजेडी स्वप्न पाहणाऱ्या विवाहितांनी ती स्वतःच्या जबाबदारीवर पाहावीत. अचानक स्वप्नभंग झाल्यास किंवा त्यांचा काही उलटा परिणाम झाल्यास, त्याला या सदराचे लेखक जबाबदार राहणार नाहीत.

Chef Vikas Khanna's favorite kairicha thecha
शेफ विकास खन्ना यांचा आवडता कैरीचा ठेचा खाल्ला आहे का? नसेल तर एकदा खाऊन पाहा, ही घ्या रेसिपी
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Kitchen Tips In Marathi How To Identify Plastic Rice Kitchen Jugaad
Kitchen Jugaad: चालू गॅसवर एकदा तांदूळ नक्की टाका; टळेल मोठा धोका, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • पाव किलो पांढरे वाटाणे
  • आलं – लसूण पेस्ट
  • चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या
  • मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
  • एक चमचा गरम मसाला
  • एक चमचा धने-जिरे पावडर
  • अर्धा चमचा हळद
  • चवीनुसार मीठ व लाल मिरचीचे तिखट
  • ५-६ उकडलेले बटाटे
  • २ कांदे बारीक चिरून
  • गोड व तिखट चटणी

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • रगडा :
    सर्वप्रथम वाटाणे रात्रभर भिजत घालावेत. सकाळी शिजवतानाच त्यात मीठ, हळद व आवडीप्रमाणे थोडे तिखट घालावे. ही उसळ मऊ शिजवून घ्यावी.
    गॅसवर कढईत तेल गरम करून घेऊन त्यात थोडे आले-लसूण पेस्ट घालून परतून घेऊन , हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने, जिरे पावडर टाकणे व नंतर शिजलेले वाटाणे पाण्यासकट घालावेत. रस दाट ठेवावा.
  • पॅटीस :
    उकडून घेललेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. हिरवी मिरची, आले, लसूण याची पेस्ट करून ती किसलेल्या बटाट्यात घालावी.
    चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत किंवा ब्रेडचा चुरा घालावा. नंतर तयार मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट्स करून शॅलो फ्राय करावेत.
    सर्व्ह करताना एका डिशमध्ये दोन पॅटीस घेऊन त्यावर रगडा घालावा. त्यावर आवडीप्रमाणे गोड व तिखट चटणी घालावी. कोथिंबीर आणि बारीक शेवेने सजावट करावी. आवडीची व्यक्ती हे पदार्थ आवडीने खात असताना त्याच तंद्रीत त्याच्याकडून आपल्या मागण्यांची यादी मंजूर करून घ्यावी.

[/one_third]

[/row]