उन्हाळ्यात द्राक्षं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. चांगल्या प्रकारचे अ‍ॅण्टीऑक्सिडण्ट्स, ‘क’ जीवनसत्व, कबरेदके, रेसव्हिट्रॉल नावाचे अत्यंत उपयुक्त द्रव्य यात असते. द्राक्षे हिरवी, काळी आणि लाल सुद्धा मिळतात. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म असतात.
उन्हाळ्यात जी त्वरित ऊर्जेची गरज असते ती याने भागते. शिवाय द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते. म्हणजेच ऊर्जा व पाणी एकाच पदार्थामधून मिळते.

उन्हाळ्यात त्वचेला जो काळपटपणा येतो किंवा खूप उन्हात फिरल्यामुळे त्वचा करपल्याप्रमाणे होते, त्या ठिकाणी द्राक्षांचा मगज लावला असता लवकर फरक पडतो. शिवाय आभ्यंतर घेऊन लवकर फरक पडतो. द्राक्षांच्या बियांचा अर्क अतिशय गुणकारी आहे. त्यात ‘इ’ जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे त्वचा, केस व हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. त्वचेचा काळवंडलेपणा कमी होतो, सुरकुत्या कमी होतात. एकूणच वयानुसार त्वचेवर दिसणारी लक्षणे कमी होतात. केसांची मुळे घट्ट होतात. केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
अर्धशिशीच्या त्रासासाठीसुद्धा द्राक्षरसाचा उपयोग होतो. विविध प्रकारची कर्करोगविरोधी तत्त्वे असल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगापासून बचाव होतो. त्यातील ल्युटिन आणि झिअ‍ॅझ्ॉन्थिन तत्त्वांमुळे द्राक्षे डोळ्यांसाठी अतिशय उपयोगी पडतात.
रेसव्हिट्रॉल या उपयुक्त द्रव्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. चांगल्या प्रकारचे कोलेस्टरॉल वाढण्यास मदत मिळते. द्राक्षांच्या बियांमध्ये रेसव्हिट्रॉल आढळते. एकूणच हृदयाच्या आरोग्यासाठी द्राक्ष अतिशय उपयुक्त असून पचनाच्या तक्रारीही दूर होतात.
वरील सर्व फायदे द्राक्षाचा कोणता प्रकार आपण वापरतो यावर अवलंबून असतात.

Rain in summer in Nagpur risk of disease increase
नागपुरात उन्हाळ्यात पाऊस, ‘हे’ आजार वाढण्याचा धोका..
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

– डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ