उपवसासाठी बरेच पदार्थ आपण आपल्या आहारात घेतो. त्यातील काही पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत तर काही पदार्थ आरोग्यासाठी वारंवार खाण्यात आले तर आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होऊ शकतात.

वरई – उपवासासाठी जास्त प्रमाणात वापरला जाणारा हा पदार्थ पचण्यासाठी अतिशय हलका. लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व जण खाऊ शकतात. लवकर पचतो व चांगले बल देतो. वरईचा भात, उपमा, इडली, ढोकळा इत्यादी अनेक पदार्थ बनविता येऊ शकतात. तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असल्याने उपवासात हमखास भेडसावणाऱ्या मलावष्टंभ या समस्येला अजिबात तोंड द्यावे लागत नाही. पोट भरल्याची जाणीव होते.

Google New App Photomath let you take a picture of a math equation and help you solve it step by step
गूगलकडे आहे ‘असा’ एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांत, जाणून घ्या
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?
how to make Fryums at home marathi recipe
Recipe : लहान मुलांसाठी खास ‘फ्रायम’ रेसिपी; घरच्या घरी हा कुरकुरीत पदार्थ कसा बनवावा ते पाहा…

राजगिरा – पचण्यास अत्यंत हलका आहे. सर्व जण खाऊ शकतात लोह व तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहे. ज्यांचे पोट जड राहते किंवा अपचन,  मंदाग्नीच्या तक्रारी आहेत. त्यांच्यासाठी उत्तम पदार्थ. पित्ताचा त्रास जास्त असणाऱ्यांनी राजगिरा जरूर आहारात ठेवावा. राजगिरा लाही, लाडू, वडी इत्यादी अनेक स्वरूपात उपलब्ध. उपवासाव्यतिरिक्तही छोटय़ा नाश्त्यासाठी हा पदार्थ उत्तम. मधुमेहाच्या रुग्णांनी, स्थूल व्यक्तींनी राजगिरा लाडू, वडी वापरण्याऐवजी राजगिरा लाही वापरावी.

साबुदाणा – उपवासामध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा पदार्थ पचण्यास जड आहे. पिष्टमय पदार्थ, काबरेडायड्रेटस जास्त प्रमाणात आहेत. प्रथिने, तंतुमय पदार्थ खूप अत्यल्प किंवा नसल्यात जमा. मधुमेही व स्थूल व्यक्तींनी तर साबुदाणा अजिबात खाऊ नये. पण त्याबरोबरच ज्यांना अपचन, मंदाग्नीच्या तक्रारी आहेत त्यांनीसुद्धा साबुदाणा टाळावा. उपवास सोडून इतर वेळीसुद्धा साबुदाणा कमीत कमी वेळा खावा. खिचडी, साबुदाणा खीर, वडे अशा अनेक स्वरूपात साबुदाणा खाल्ला जातो. रात्रीच्या वेळी इतर शक्यत: साबुदाणा टाळावा. तंतुमय पदार्थ जवळ जवळ नसल्याने पचनास जड होतो आणि मलावष्टंभ होऊ शकतो.

 

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com