‘मेरा कलम तो अमानत है मेरे लोगों की, मेरा कलम तो अदालत मेरे जमीर की है’ किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले’ लिहिणारे शायर अहमद फराज. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा यावरचे तरल संवेदनशील शेर ही त्यांच्या शायरीची खासियत. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.

ए कोणीसशे सत्तरच्या दशकात उर्दू शायरीच्या विश्वात कुणी तरी एक वाक्य प्रस्तृत केलं होतं. साहिर लुधियानवी अन् ‘तो’ हे फैज या महान शायराची कार्बन कॉपी आहेत अन् तेही ड्रॉन बाय बॉलपेन ऑन ब्लॉटिंग पेपर. तेव्हा साहिर अन् ‘त्याच्या’वर फैज शैलीचा (सामाजिक पाश्र्वभूमीवर व्यक्तिगत प्रेमाला गौणत्व देण्याचा) पगडा अवश्य जाणवत असे. त्याची काव्याभिव्यक्ती फैजच्याच रंगात होत असे. पण तरीही तो लोकप्रिय होत गेला. फैज एक दिवस त्याला म्हणाले, ‘फराज, अब तो हमारे रंग में शायरी करना छोड दो।’ त्यावर तो त्वरित उत्तरला, ‘फैजसाहब अब तो ये रंग हम पर पुरा चढ चुका है। ये उतरनेवाला है नहीं। आप से हो सके तो आप अपना रंग बदल लीजिए।’
हा होता पाकिस्तानचा बहुचर्चित शायर अहमद फराज. त्याच्या शायरीवर फैज व अहमद नदीम कासमीच्या भावुक व संवेदनशील शैलीचा प्रभाव होता. सामाजिक संदर्भ त्यांच्या गज़लेपेक्षा कवितेत प्रकर्षांने साकारतात. ग़जलेत प्रणयाचा रंगछटा तरल शब्दशैलीत उमलतात. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोडम्के जाने के लिए आ

marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
How did the Barbie pink color craze spread around the world
बार्बी पिंक रंगाची क्रेझ जगभरात कशी पसरली? जाणून घ्या गुलाबी रंगाचा इतिहास
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले
‘दर्द-आशोब’ या फराजच्या पहिल्या संग्रहातील गज़ला मेहदी हसनने गाऊन जगभर पोहचवून लोकप्रिय केल्या. (या लोकप्रियतेत मेहदी हसनचे योगदान मान्य करूनही.) पण व्यथित करणारी गोष्ट ही की या गज़ला (वाङ्मयीन जाणकार सोडून) फराज ऐवजी, मेहदी हसनच्या गज़ला अशाच संबोधल्या जातात. विनम्र मेहदी हसन मात्र गज़ला गाताना शायराचे नाव अवश्य नमूद करत. मराठीत असे सहसा घडताना दिसत नाही. फराज म्हणतो,
मगर किसी ने हमें हमसफर नहीं जाना
यह और बात कि हम साथ-साथ सब के गए
पण हेही सांगतो,
हमसफर चाहिये * हूजुम नहीं
इक मुसाफिर भी काफिला है मुझे
जीवनाच्या संदर्भात फराज म्हणतो,
जिंदगी हम तेरे दागों से रहे शìमदा
और तू है कि सदा *आइनाखाने मांगे

आवाज दे के जिंदगी हरबार छुप गई
हम ऐसे सादा दिल थे कि हरबार आ गए

जिंदगी में भी गज़ल ही का *करीना रख्खा
ख्वाब-दर ख्वाब तेरे गम को पिरोया कैसे
प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा इत्यादीचे शेर फराजच्या गज़लांचे वैशिष्टय़ आहे.
त्यातील काही शेर-
ये क्या कि तुम ही हमे-हिज्रा के *फसाने कहो
कभी तो उसके बहाने सुना करो उससे

आँख में आंसू जडे थे पर सदा तुझको न दी
इस *तवक्को पर कि शायद तू पलटकर देखता

तेरे होते हुए आ जाती थी सारी दुनिया
आज तनहा हूँ तो कोई नहीं आनेवाला
अहमद फराज १२ डिसेंबर १९३१ रोजी नौशेहरा (पाकिस्तान) येथे जन्मले. वडील सय्यद मोहम्मदशाह परख पेशावर विद्यापीठात प्राध्यापक होते. फराजच्या काव्यलेखनाचा आरंभ असा झाला. ते दहावीत शिकत असताना वडिलांनी मोठय़ा मुलासाठी महाग इंग्लिश सुटाचं कापड घेतलं अन् लहान फराजसाठी स्वस्त कश्मिरी कापड खरेदी केलं. हा भेदभाव फराजच्या पचनी पडला नाही. त्याने लगेच एक शेर रचला अन् तो वडिलांच्या उशाशी ठेवला –
जब कि सब के वास्ते लाये है कपडे सेल से
लाये है मेरे लिए कैदी के कंबल जेल से
नरेंद्रनाथ म्हणतात, ‘‘प्यार, परंपरा की मख्मली तहों में लिपटे अन्याय के विरुद्ध फराज का यह गुस्सा उसकी शायरी में बार बार गुंजता है।’’
अब तलक दूर है तो तेरी *परस्तिश कर लें
हम जिसे छू न सकें उसको ‘खुदा’ कहते है

यूँ ही मौसम की अदा देख के याद आता है
किस कदर जल्द बदल जाते है इन्सां जानाँ
अहमद फराजच्या शायरी संग्रहाची नावे अशी, ‘दर्द-आशोब’,‘तनहा-तनहा’, ‘शब खून’, ‘नायाफ्त’, ‘जानाँ-जानाँ’, ‘बे-आवाज गली-कूचों में’ ‘नाबीना शहर में आईना’, ‘असासा’.
ज्येष्ठ उर्दू समीक्षक शमीम हनफीच्या मते फराजच्या भाषेवर व कथनशैलीवर फारसी व क्लासिकल उर्दू गजलचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो
*रफ्ता-रफ्ता यहीं *जिन्दा में बदल जाते है
अब किसी शहर की *बुनियाद न डाली जाए

वक्त ने वो *खाक उडाई है कि दिल के *दश्त में
काफिले गुजरे है फिर भी *नक्शे-पा कोई नहीं

कल *तारीख यकीनन खुद को दोहराएगी
आज के इक-इक *मंजर को पहचान में रखना
मनमोहक तरल संवेदनशील शेर ही फराजच्या शेरांची खासियत. त्यातील हे काही-
दिल को तेरी चाहत पे भरोसा भी बहुत है
और तुझ से बिछड जाने का डर भी नहीं जाता

जिस तरह बादल का साया प्यास भडकाता रहें
मैंने यह आलम भी देखा है तेरी तस्वीर का

अब न वो मैं न वो तू है न वो *माजी है फराज
जैसे दो साये तमन्ना के *सराबों में मिले

मैं तेरा नाम न लूँ फिर भी लोग पहचाने
कि आप अपना *तारुफ हवा बहार की हैं

उसने नजर-नजर मैं ही ऐसे भले *सुखन कहें
मैंने तो उसके पाँव में सारा *कलाम रख दिया

उदासियाँ हो *मुसलसल तो दिल नहीं रोता
कभी-कभी हो तो यह *कैफियत भी प्यारी लगे
१९५१ मध्ये फराज पेशावरहून कराचीला आले. एक वर्ष कराची रेडिओवर कार्यक्रम करीत होते. ती नोकरी सुटली. अन् पेशावरला परतले. अन् १९५४ साली बी. ए. करतानाच त्यांचा ‘तनहा- तनहा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी फारसीमध्ये एम.ए. केलं. अन् ते पेशावर रेडिओवर निर्माते झाले. अन् वडील सेवानिवृत्त होताच पेशावर विद्यापीठात लेक्चरर झाले. पाकिस्तान नॅशनल सेंटर इस्लामबादचे डायरेक्टरही झाले. १९८२ ला त्यांना हद्दपार करण्यात आलं तेव्हा ते लंडनला राहिले. सरकार बदलल्यावर ते पाकिस्तानात परतले. त्यांनी पाच-सहा नाटकंही लिहिली. पाकिस्तानात फैजनंतर साहिरसारखी अनन्य लोकप्रियता लाभलेले कतील, मुनीर नियाजी, परवीन शाकिर अन् सर्वप्रथम फराजच म्हणता येईल.
मंजिले दूर भी है मंजिले नजदीक भी हैं
अपने ही पाँव में जंजीर पडी हो जैसे

दिल को अब यूँ तेरी हर इक अदा लगती है
जिस तरह नशे की हालत में हवा लगती है

*जख्मे-हिज्र भरने से याद तो नहीं जाती
कुछ निशाँ तो रहते है दिल रफू भी हो जाए
स्वतच्या संदर्भातले फराजचे वक्तव्य ऐका-
शेर किसी के हिज्र में कहना हर्फे-विसाल किसी से
हम भी क्या है ध्यान किसी का और सवाल किसी से
काही वेळा विरक्त होत म्हणतात –
फराज ख्वाब-सी दुनिया दिखाई देती हैं
तर एवढी मान्यता मिळूनही म्हणतात-
मीरो-गालिब क्या कि
बन पाए नहीं फैज-व-फिराक
पण साठोत्तरी उर्दू गज़लचे ते माइलस्टोन होते.
मेरा कलम तो *अमानत है मेरे लोगों की
मेरा कलम तो अदालत मेरे जमीर की हैं
फराजच्या निधनाने त्याच्याच शब्दात सांगायचं तर
जो भी हो साहिबे-मंजिल ही कहता है ‘फराज’
कि वह उठ जाये जो महफिल से तो महफिल न रहें
म्हणूनच दुनिया में ऐसे लोग बहुत कम है दोस्तों..

रंजिश : वैमनस्य, नाराजी, हुजूम : भीड, आइना ए खाने : आरश्यांची घरे, करीना : ढंग, गमे-हिज्र : वियोग-व्यथा, फसाने : आख्यायिका, तवक्को : आशा, भरवंसा, परस्तिश : पूजा, रफ्ता-रफ्ता : हळूहळू, जिन्दा : जेल, बुनियाद : पायाभरणी, खाक : धूळ, माती, भूमी, दश्त : अरण्य नक्शे-पा : पदचिन्ह, तारीख : इतिहास, यकिनन : निश्चितच, मंजर : दृश्य, तारुफ : ओळख, सुखन : बोल, वचन, कलाम : लिखाण, रचना, मुसलसल : सतत, कैफियत : स्थिती, नशा, जख्मे-हिज्र : वियोगाची जखम, सराब : मृगजळ, अमानत : ठेव, माजी : भूतकाळ
dr.rampandit@gmail.com