फिक्शन
१) पेपरबॅक ड्रीम्स : राहुल सैनी, पाने : २४८१४० रुपये.
सध्या इंगजीत लिहिणाऱ्या भारतीय तरुण लेखकांचे मानसशास्त्र उलगडणारी ही कादंबरी. या लेखकांना झटपट पैसा आणि प्रसिद्धी कशी हवी असते, त्याची हकिकत.
२) द हेन हू ड्रिम्ड शी कुड फ्लाय : सूं-मी वांग, पाने : १३४२९९ रुपये.
ही  जॉज ऑर्वेल यांच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’सारखी मूळ कोरियन कादंबरी. तिची नायिका असलेली कोंबडी तिच्या जगातून बाहेरच्या जगात उडून जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असते.
३) टॅटीयाना : मार्टिन क्रुझ स्मिथ, पाने : ३३६४९९ रुपये.
तीसहून अधिक लोकप्रिय रहस्यमय कादंबऱ्या लिहिणाऱ्या मार्टिनची ही कादंबरी मॉस्कोमध्ये घडते. एका पत्रकार महिलेने तिच्या डोळ्यासमोर घडलेल्या खुनाचा लावलेला छडा, हा विषय.
४) द स्कॅटर हेअर इज टू ग्रेट : बिलाल तन्वीर, पाने : २१४३५० रुपये.
पाकिस्तानी लेखकाची ही कादंबरी तेथील सतत अस्थिर आणि बेभरवशाच्या परिस्थितीतल्या एक कवी, त्याचा उद्योजक मुलगा आणि एका तरुणाच्या परवडीची ‘संघर्षगाथा’ सांगते.
५) लँड व्हेअर आय फ्ली : प्रज्वल पराजुली, पाने : ४००४९९ रुपये.
एनआरआय लेखकाची ही ‘होमसिक ब्रिगेड’ कादंबरी हिमालयात घडते.
नॉन-फिक्शन
१) पारशी बोल- इन्सल्टस, एन्डॉर्मेट अँड अदर पारशी गुजराती फ्रेजेस : सुनी तारपोरवाला, मेहेर मारफातिया, पाने : २६४५०० रुपये.
पारशी-गुजरातीमधील ७३० वाक्प्रचारांची ओळख करून देणारे हे पुस्तक हाडाच्या मुंबईकराने वाचावेच.
२) पर्पच्युअल सीटी-अ शॉर्ट बायोग्रफी ऑफ दिल्ली : मालविका सिंग, पाने : १३६२९५ रुपये.
‘सेमिनार’ या विद्वतमान्य मासिकांच्या प्रकाशक असलेल्या लेखिकेने स्वत:ची विद्वत कौटुंबिक परंपरा सांगत कायमच असामान्य शहर राहिलेल्या दिल्लीचा इतिहास यात सांगितला आहे.
३) द सायकोपाथ इनसाइड : जेम्स फॅलन, पाने : २५६/७९९ रुपये.
मानवी मनाच्या गूढगंभीर मेंदूविषयी आयुष्यभर संशोधन करणाऱ्या संशोधकाचे वैचित्र्यपूर्ण आत्मचरित्र.
४) द लँड ऑफ फ्लाइंग लामाज  : गौरव पुंज, पाने : २५६३९५ रुपये.
हिमालयीन प्रवासातला थरार, रोमांचकता आणि खुमारी सांगणारे प्रवासवर्णन.
५) द ईमेल रिव्होल्यूशन : व्ही.ए. शिवा अय्यादुराई, पाने : ४५०४९९ रुपये.
नामांकित कंपन्यांच्या ईमेलची प्रणाली राबवणाऱ्या लेखकाचे कॉपरेरेट क्षेत्रात ईमेलने केलेल्या बदलांची महती सांगणारे हे पुस्तक विश्वसंवादाच्या पद्धती सांगते.