सध्याचा जमाना हा सेल्फ हेल्प पुस्तकांचा आहे. ‘श्रीमंत कसे व्हाल?’, ‘बॉस कसे व्हाल?’, ‘आनंदी कसे व्हाल?’, ‘तणावांपासून मुक्ती कशी मिळवाल?’ वगैरे वगैरे. त्यामुळे हल्ली कथा-कविता-कादंबऱ्या असं सर्जनशील साहित्य फारसं कुणी वाचत नाही, असं म्हटलं जातं. ही सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकं वाचक ज्या उद्देशाने वाचतात तो खरोखरच साध्य होतो का? त्याचं उत्तर ‘नाही’ असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून पुढे आलं आहे. युरोपातील लिव्हरपूल विद्यापीठातील संशोधकांनी हे  संशोधन केलं. त्यांनी ३० लोकांना आधी सेल्फ प्रकारची पुस्तकं वाचायला दिली. आणि नंतर वर्ड्सवर्थ, हेन्री व्हॅगन, जॉन डाइक, एलिझाबेथ बॅरेट ब्राऊनिंग, फिलीप लार्किन आणि टेड ह्य़ुजेस या लेखकांची अभिजात पुस्तकं दिली. या दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचं वाचन करत असताना त्यांच्या मेंदूमध्ये घडणाऱ्या बदलांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना असं आढळून आलं की, सेल्फ हेल्प पुस्तकांपेक्षा अभिजात साहित्याच्या वाचनाने मनोबल वाढण्यास मदत होते. चांगलं गद्य आणि कविता यांच्या वाचनाने मेंदूतील विद्युत प्रवाह कार्यान्वित होतो, पण हा परिणाम मात्र अनुवादाचं वाचन केल्यानं साधला जात नाही. या संशोधनाचा अंतिम निष्कर्ष असा की, सेल्फ हेल्प पुस्तकांपेक्षा अभिजात साहित्य अधिक परिणामकारक ठरतं. थोडक्यात काय तर मानवी मूल्ये आणि संवेदनशीलता यांची जपवणूक आणि संवर्धन अभिजात साहित्याच्या वाचनामुळेच होते. म्हणूनच ते वाचायचं असतं.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ नॉन-फिक्शन
गिडिअन्स स्पाइज – द सिक्रेट हिस्ट्री ऑफ द मोसाद : जॉर्डन थॉमस, पाने : ७८४६९९ रु.
द सिग्नल अँड द नॉइज : नेट सिल्व्हर, पाने : ५४४८९९ रु.
द संजय स्टोरी : विनोद मेहता, पाने : २७२४९९ रु.
अवर मून हॅज ब्लड क्लॉट्स : राहुल पंडिता, पाने : २७२४९९ रु.
रिटर्न ऑफ अ किंग : विल्यम डॅलरीम्पल, पाने : ६०८७९९ रु.

टॉप  ५  फिक्शन
द सिटी ऑफ देवी : मनील सुरी, पाने : ४००४९९ रु.
डेज ऑफ गोल्ड अँड सेपिया : यास्मिन प्रेमजी, पाने : ४२५३९९ रु.
टॉवर : अ‍ॅवान जेसिया, पाने : ४१२३९९ रु.
लंडन कंपनी : फारुख धोंडी, पाने : २४८४९५ रु.
द सिक्रेट विश लिस्ट : प्रीती शेणॉय, पाने : २७०१७५ रु.