काही महिन्यांपूर्वी विक्रम सेठ यांची आगामी कादंबरी ‘सुटेबल गर्ल’चे हस्तलिखित दिलेल्या वेळेत पोचते न केल्याने पेंग्विन या प्रकाशनसंस्थेने सेठ यांना मानधन परत करण्यास सांगितले होते. तेव्हा या बातमीची जगभर – विशेषत: युरोप-अमेरिकेत – विशेष दखल घेतली गेली.
सहा आकडी मानधन घेणाऱ्या, ‘सुटेबल बॉय’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आणि ‘सुटेबल बॉय’ला दहा वर्षे पूर्ण होतानाच त्याचा पुढचा भाग प्रकाशित करण्याचे कबूल केलेल्या सेठ यांना आपला शब्द ‘सुटेबल’ वेळेत पाळता आला नव्हता.
त्यामुळे प्रकाशकाच्या आगामी योजनांवर पाणी पडले होते. आणि ‘सुटेबल बॉय’च्या दशकपूर्तीचा फायदाही घेता येणार नव्हता. त्यामुळे  पेंग्विनने सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतली होती. पण  सेठ यांच्यासारखा हुकमी (सध्या अनसुटेबल ठरत असला तरी) लेखक गमावणे परवडण्यासारखेही नव्हते. त्यामुळे नंतर पेंग्विन आणि सेठ यांच्यात नव्याने चर्चा होऊन सेठ यांना आणखी एक-दीड वर्षांची मुदत वाढवून मिळाली आहे. यामुळे सेठ यांना थोडा अधिक वेळ मिळाला असून आता या ‘सुटेबल गर्ल’ला २०१५ साली येण्याचे कर्तव्य राहील. तेव्हा ती लेखक-प्रकाशकाप्रमाणेच वाचकांनाही ‘सुटेबल’ होईल, अशी आशा करायला करायला काय हरकत आहे?

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
टीटाइम फॉर द फायरफ्लाय : शोना पटेल, पाने : ४०७२९९ रुपये.
द अदर साइड : विवेक बॅनर्जी, फराज़्ा काझी, पाने : २६४१५० रुपये.
वन पार्ट वुमन : पेरुमल मुरुगन, पाने : २४८३९९ रुपये.
द स्कॅटर हेअर इज टू ग्रेट : बिलाल तन्वीर, पाने : २१४३५० रुपये.
लँड व्हेअर आय फ्ली : प्रज्वल पराजुली, पाने : ४००४९९ रुपये.
टॉप  ५ नॉन-फिक्शन
ड्रिव्हन- मेमॉयर्स ऑफ अ सिव्हिल सर्व्हट टर्नड आन्त्रप्रेन्यूर : जगदीश खत्तार, पाने : ३५२६९९ रुपये.
घालिब डेंजर : नीरज पांडे, पाने : २६४/२५० रुपये.
सचिन तेंडुलकर : इंद्रनील राय, पाने : ९६१२५ रुपये.
द ईमेल रिव्होल्यूशन : व्ही.ए. शिवा अय्यादुराई, पाने : ४५०४९९ रुपये.
इफ इट्स मंडे इट मस्ट बी मदुराई : श्रीनाथ पेरूर, पाने : २९६४९९ रुपये.
सौजन्य – फ्लिपकार्ट.कॉम