दोन जुळी मुले जन्माला आली व त्यातील एक भारतात राहिला अन् दुसरा अमेरिकेत गेला. नंतर दहा वर्षांनी दोघे एकत्र आले तर जुळे असूनही दोघांमध्ये फरक दिसून येतो, यावर आपला विश्वास बसणार नाही, पण तसे घडते, कारण आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणीय घटकांचा माणसाच्या जनुकांवर परिणाम होत असतो. जनुकांवर बाहय़ घटकांचा कसा परिणाम होत जातो हे संजीव गलांडे सरांनी त्यांच्या ‘आयसर’मधील (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड फाऊंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च) प्रयोगशाळेत अगदी फळ्यावर प्रयोग समजून देऊन आम्हाला सांगितले होते; निमित्त होते त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाल्याचे..
अत्यंत उमदे व्यक्तिमत्त्व व अवघड गोष्टी सोप्या करण्याची हातोटी त्यांना लाभली आहे. आपल्या शरीरात अब्जावधी जनुके असतात व ती ऋतुमानानुसार आपले काम करीत असतात. थंडीत काम करणारी जनुके उन्हाळ्यात चक्क गुंडाळून ठेवली जातात; थंडीतील कपडे आपण उन्हाळ्यात घडी घालून ठेवून देतो अगदी तशी.. जनुकांचे आविष्करणही मानवी शरीरात अनेक गोष्टी घडवत असते. पर्यावरणाचा मोठा परिणाम जनुकांच्या कार्यावर होतो, त्यामुळे जुळी मुलेही अगदी एकसारखी राहात नाहीत. थोडक्यात, जनुकांवर बाहय़ घटकांचा जो परिणाम होतो त्याला ‘एपिजेनेटिक्स’ असे म्हणतात व याच विषयावरील संशोधनासाठी डॉ. गलांडे यांना नुकताच प्रतिष्ठेचा जी. डी. बिर्ला पुरस्कार जाहीर झाला आहे. गलांडे यांचा जन्म २० सप्टेंबर १९६७ मध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेत झाले. नंतर एस.पी. कॉलेजमधून ते पदवीधर झाले. त्यांचा ओढा विज्ञान संशोधनाकडे असल्याने १९९६ मध्ये ते बंगळुरू येथे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स संस्थेत दाखल झाले व तेथे जैवरसायनशास्त्रात पीएच.डी. झाले. १९९६ ते २००१ या काळात त्यांनी अमेरिकेत लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी येथे डॉक्टरेट केली. खरे तर त्यांना अमेरिकेत राहता आले असते, पण २००१ मध्ये पुण्यात परत येऊन राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्रात त्यांनी संशोधन सुरू केले. सध्या ते ‘आयसर’ या संस्थेत ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन एपिजेनेटिक्स’ या विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गलांडे यांच्या संशोधनाचा उपयोग संसर्गजन्य रोग व कर्करोग यांच्यामागची कारणे समजावून घेताना नक्कीच होईल. त्यांच्या प्रयोगशाळेने एपिजेनेटिक्सचे संशोधन करताना यीस्ट, ड्रॉसोफिला व झेब्राफिश या सजीवांची प्रारूपे तयार केली आहेत. वयाच्या पन्नाशीपूर्वीच त्यांनी दोन मानाचे पुरस्कार पटकावून ‘ब्रेनड्रेन’ला उत्तर दिले आहे.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?