‘पारंपरिक सद्गुण वेगळे आणि पर्यावरणनिष्ठ सद्गुण वेगळे’ अशी टोकाची भूमिका घेण्याच्या टप्प्यावर नीतिशास्त्राची ही शाखा आज पोहोचली आहे..हा झगडा मात्र नव्हे. तो दृष्टिकोनातील फरक आहे, हे समजून घ्यायला हवे..
पर्यावरणाचा विचार पर्यावरणवाद आणि पर्यावरण अध्ययन यात होतो. पण पर्यावरण नीतिशास्त्र त्यापेक्षा भिन्न दृष्टिकोनातून मानव आणि परिसर यांच्या नात्याचा शोध घेते. पर्यावरणवाद (Environmentalism) हा पर्यावरणविषयक विविध सिद्धांत, पर्यावरण प्रणाली आणि सामाजिक चळवळी यांचा समावेश असलेले व्यापक स्वरूपाचे तत्त्वज्ञान आहे. दबाव गट स्थापन करणे, चळवळी करणे आणि प्रशिक्षण देणे ही कामे पर्यावरणवाद करतो. पर्यावरण अध्ययन (Environmental studies) ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरणाचा अभ्यास करणारी शाखा आहे. पर्यावरण नीतिशास्त्र हा तत्त्वज्ञानाचा हिस्सा आहे. नीतीविषयक विचारांची कक्षा केवळ मानवापुरती न ठेवता, मानवासह मानवेतर सजीवांनाही सामावून घेईल अशी व इतकी व्यापक करावी, असे मध्यवर्ती धोरण स्वीकारावे; असा धोरणात्मक नतिकतेचा आग्रह धरणारी ही उपयोजित नीतिशास्त्राची शाखा आहे. पर्यावरणविषयक कायदे, पर्यावरण समाजशास्त्र, पर्यावरण धर्मशास्त्र, पर्यावरण अर्थशास्त्र, पर्यावरण भूगोल व खुद्द पर्यावरण विज्ञान अशा अनेक सामाजिक व नसíगक विज्ञानांचा चिंतनविषय असणारे हे आंतरविद्याशाखीय नीतिशास्त्र आहे. जैवनीतिशास्त्र, व्यावसायिक नीतिशास्त्र, धंद्याचे नीतिशास्त्र व अभियांत्रिकी नीतिशास्त्र यांच्याशी त्याचा अतिशय गुंतागुंतीचा संबंध आहे.
सन १९१५ मध्ये डॉ. अल्बर्ट श्वायत्झर (१८७५-१९६५) या जर्मन डॉक्टर तत्त्ववेत्त्याने मांडलेला ‘जीवनविषयक पूज्यभाव’ (The Reverence for Life) हा विचार जगातील पहिला पर्यावरणनीतीचा विचार मानला जातो. जीवन या संकल्पनेत श्वायत्झर यांनी पृथ्वी आणि सर्व सजीव सृष्टीचा समावेश केला. त्यानंतर पॉल टेलर (१९२३.) या अमेरिकन विचारवंताचा ‘निसर्गाविषयीचा आदर’ सिद्धांत, आल्डो लिओपोल्ड (१८८७-१९४८) या विख्यात पर्यावरण तत्त्ववेत्त्याच्या दि सॅण्ड कौंटी अल्मॅनक (१९४९) या पुस्तकातील भूमी नीती (Land Ethics) सिद्धांत आणि राशेल कार्सन या सागर जीवशास्त्रज्ञ विदुषीच्या Silent Spring (१९६२) या पुस्तकांनी या विषयाला तोंड फुटले. नंतर Science या अमेरिकन नियतकालिकात ‘दि हिस्टॉरिकल रूट्स ऑफ आवर इकोलॉजिक क्रायसिस’ (१९६८) या लिन व्हाइट्स आणि गॅरट हार्डीन या प्राणिशास्त्रज्ञ पर्यावरणतज्ज्ञाच्या (१९१५-२००३) ‘दि ट्रॅजेडी ऑफ दि कॉमन्स’ (१९६८) या निबंधाने आणि ‘एक्स्प्लोिरग न्यू एथिक्स फॉर सरव्हायवल : दि व्हायेज ऑफ दि स्पेसशिप बिगल’ (१९७२) या पुस्तकाने या विद्याशाखेच्या अभ्यासाचा पाया रचला. विशेषत: राशेल कार्सनने डी.डी.टी. व इतर रासायनिक औषधांमुळे पिके विषारी बनणे, मानव व मानवेतर प्राणी नष्ट होण्याचा सिद्धांत मांडल्यानंतर पॉल एलरीचच्या The Population Bomb या पुस्तकाने भर घातली. आणि १९७० च्या पहिल्या जागतिक वसुंधरा दिन परिषदेनंतर पर्यावरणाचे नीतिशास्त्र या यथार्थ नावाने ही नवी विद्याशाखा अस्तित्वात आली. स्कॉटिश भूगर्भशास्त्रज्ञ जेम्स हटन (१७२६-१७९७), रशियन भूरसायनशास्त्रज्ञ व्लादिमिर वेर्नाद्स्की (१८४५-१९६३), ब्रिटिश शास्त्रज्ञ जेम्स लव्हलॉक (१९१९) व त्याच देशातील पत्रकार, छायाचित्रकार गाय मूरची (१९०७-१९९७), तत्त्ववेत्ते स्टीफन क्लार्क (१९४५) तसेच  अमेरिकी जीवशास्त्रज्ञ लिन मार्गुलीस (१९३८-२०११) यांच्या पर्यावरणविषयक मांडणीतून विसाव्या शतकात गय्या नीतिशास्त्र विकसित झाले. गय्या (Gaia) म्हणजे ग्रीक भाषेत पृथ्वी किंवा भूदेवी. १९७० साली अमेरिकेत Environmental Ethics हे नियतकालिक सुरू झाले.
पर्यावरण नीतिशास्त्र मुख्यत: पाच समस्यांचा अभ्यास करते. (१) विविध प्रकारचे प्रदूषण (२) नसíगक साधनसंपत्तीचा दुरुपयोग (३) वाढती लोकसंख्या (४) प्राण्यांविषयी माणसाची अभिवृत्ती आणि माणूस त्यांना देत असलेली वागणूक (५) विविध प्रकारच्या पर्यावरण प्रणालींचे स्वयंसिद्ध मूल्य. पर्यावरण नीतिशास्त्र या विद्याशाखेत ईश्वरकेंद्रवाद, मानवकेंद्रवाद, जैवकेंद्रवाद आणि पर्यावरणकेंद्रवाद हे निव्वळ अ‍ॅकेडेमिक सिद्धांत आणि प्राण्यांचे हक्क, शाकाहारवाद, प्राण्यांवरील प्रयोगांबाबत नतिक धोरणे तसेच शाश्वत विकास ही संकल्पना, उथळ पर्यावरणवाद विरुद्ध सखोल पर्यावरणवाद हे चळवळीतून निष्पन्न होणारे मुद्दे अभ्यासले जातात. अर्थात विविध देशांतील विद्यापीठांच्या व सरकारच्या धोरणांनुसार काही बदल होतात, पण साधारणत: हे समान मुद्दे असतात.
‘स्त्रीवादी पर्यावरणवाद’ हा या नीतिशास्त्राचा विकसनातील महत्त्वाचा टप्पा आहे. फ्रान्को डी युबोनी (१९१२-२००५) या फ्रेंच स्त्रीवादी लेखिकेने ज्याचा साधारण अर्थ स्त्रीवाद किंवा मृत्यू असा होतो, अशा शीर्षकाच्या पुस्तकात उपयोगात आणलेल्या फ्रेंच संज्ञेचे ecofeminism हे इंग्लिश भाषांतर. स्त्रीचे अवमूल्यन व पृथ्वीचे अवमूल्यन यांतील साम्य अधोरेखित करून त्या साम्यावर व पुरुषप्रधानतेवर युबोनीने प्रहार केला.
विसाव्या शतकात या सर्व मांडणींना लोउक फोन वेनस्वीन  या नेदरलँड्स येथील संशोधिका आणि पर्यावरण नीतिशास्त्रज्ञ विदुषीने अत्यंत वेगळी कलाटणी दिली आहे. तिने पर्यावरण सद्गुण नीतिशास्त्र (Environmental virtue ethics) ही नवी मांडणी पुढे आणली. ती अमेरिकेतील काही विद्यापीठे व शिक्षण संस्थांप्रमाणेच उद्योग समूहांत शिकविली जात आहे. परिणामी पर्यावरण नीतिशास्त्राकडे, चळवळींकडे पाहण्याचा अभ्यासकांचा व पाश्चात्त्य राष्ट्रांतील सरकार वा धोरणकत्रे यांचा दृष्टिकोन बदलला, तो अधिक पूरक आणि जास्तीत जास्त वास्तव बनला.
वेनस्वीनच्या मते, आजपर्यंतच्या पर्यावरण-विषयक सद्धान्तिक मांडणीमध्ये तत्त्ववेत्ते, विचारवंत, कार्यकत्रे, बिगरसरकारी संस्था इत्यादी संबंधित मंडळींनी जी भाषा वापरली त्या भाषेचे आज नव्याने विश्लेषण करणे आवश्यक आहे. तिच्या मांडणीनुसार पर्यावरण नीतिशास्त्रज्ञ, कार्यकत्रे, बिगरसरकारी संस्था इत्यादी संबंधित मंडळी पारंपरिक सद्गुणांची मूल्यजड भाषा वापरण्याची सवय असते आणि हजारो वष्रे तीच ती भाषा वापरली गेल्याने लोकांवर तिचा काहीही परिणाम होत नाही, ती भाषा अतिशय उथळ, गुळमट, निष्प्रभावी बनते. उलट ते नतिक संकल्पनांची चेष्टा करतात, म्हणजे नतिकतेची चेष्टा करतात. गांभीर्याने घेत नाहीत. त्यासाठी ही नीतीची परिभाषेची पुनर्रचना करता येईल आणि ही नतिकता प्रत्यक्ष सार्वजनिक धोरणप्रक्रियेत आणि दैनंदिन जीवनात कशी अमलात येईल, हा प्रकल्प राबवला पाहिजे. याबाबतचे वेनस्वीनने लिहिलेले क्रांतिकारक पुस्तक म्हणजे ‘डर्टी व्हर्च्यूज : द इमर्जन्स ऑफ इकॉलॉजिकल व्हर्च्यू एथिक्स’ (१९९७). यातील ‘डर्टी व्हर्च्यूज’ म्हणजे ‘अस्वच्छ/ घाणेरडे सद्गुण’ असे नसून ‘डर्ट’ म्हणजे माती, पर्यायाने पृथ्वी. म्हणून ‘डर्टी व्हर्च्यूज’ म्हणजे पृथ्वीविषयक सद्गुणशास्त्र.
पर्यावरणविषयक साहित्याचे व्यापक सर्वेक्षण करून वेनस्वीनने विद्यमान पर्यावरण सद्गुणवादी सिद्धांताला जुळणाऱ्या मूळतत्त्वांचा समावेश करणारी नवी ‘हरित सद्गुण भाषा’ रचण्याचा आधुनिक प्रस्ताव दिला आहे. या पुस्तकात तिने अशा १८९ सद्गुणांचा आणि १७४ दुर्गुणांची यादीच जोडली आहे. आजपर्यंत मांडलेल्या हजारो सद्गुणवादी संकल्पनांच्या जंजाळामधून नेमकी परिभाषा आजच्या पर्यावरण युगात वापरणे, याचा अर्थ आपली भूमिका नेमकी, नेटकी करणे, असे ती मांडते.
भारतात ‘वृक्ष-वल्ली आम्हां सोयरी वनचरें’ अशा अंगाने जाणारे आदरणीय नतिक विचार प्राचीन काळापासून मांडण्यात येतात, हे खरे आहे. पण एखादा विचार गोड काव्यात मांडणे आणि तोच सार्वजनिक धोरण, जीवनरीत म्हणून सरकार आणि लोकांनी स्वीकारणे या दोन कृतींमध्ये फरक केला पाहिजे. वैदिक यज्ञ संस्कृतीतील िहसेला उत्तर म्हणून अिहसा व प्रेम हे जीवनधोरण म्हणून नीतिशास्त्र मांडले ते केवळ जैन आणि बौद्ध धर्माने. झेन बुद्धिझम व पर्यावरण नीती यावर पाश्चात्त्य चर्चाविश्वात प्रचंड संशोधन झाले आहे, चालू आहे.
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.

Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?