संपादकीय
- अग्रलेख
- विशेष लेख
- अन्वयार्थ
- चैतन्य चिंतन
- लाल किल्ला
- कलाभान
- सह्याद्रिचे वारे
- राखेखालचे निखारे
- व्यक्तिवेध
- गल्लत , गफलत , गहजब !
- राजधानीवर मराठी मोहोर
- जमाखर्च राजकारणाचा
- आज..कालच्या नजरेतून
- बुकमार्क
- वार्ता ग्रंथांची
- बुक-अप!
- बुक - वर्म
- लोकमानस
- अन्यथा
- रविवार विशेष
- भवताल
- रुजुवात
- आकलन
- वाचावे नेटके
- पसायधन
- प्रसार-भान
- ग्रंथविश्व
- आनंदयोग
- ई-लोकमानस
- अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- पीएच.डी. सर्वात सोपी!
- हे राज्य ही तो बिल्डरांची इच्छा!
- सचिन चालिसा!
- वापरलेलं...
मोस्ट रीड
एरवी निधर्मीवादाची पुंगी वाजवत टीव्ही वाहिन्यांचे उंबरठे झिजवणारे विचारवंतही काश्मिरी धर्ममरतडांचा सक्रिय निषेध करताना दिसत नाहीत. कोणत्याही धर्माचा असा निलाजरा एकारलेपणा वाईटच.
कोणा निर्बुद्ध धर्मगुरूने केलेल्या विरोधामुळे काश्मिरात स्थापन झालेला पहिलावहिला मुलींचा वाद्यवृंद बंद करावा लागणार आहे. नोमा नझीर, फराह दीबा आणि अनिका खलिद या तीन मुली फक्त दहावीत शिकतात. तिघींनाही गाण्याची हौस. त्याचमुळे तिघींनी एकत्र येऊन स्वत:चा असा छोटा वाद्यवृंद स्थापन केला होता. प्रगाश या नावाच्या वाद्यवृंदाचे नुकतेच कोठे प्रयोग होऊ लागले होते. प्रगाश म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे प्रवास. परंतु इस्लाममधील धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा मुळात प्रकाशालाच विरोध असल्याने त्यांना हा प्रयोग सहन झाला नाही आणि त्यावर जोरदार टीका होऊ लागली. प्रकरण इथेच थांबले असते तर ते एक वेळ ठीक म्हणता आले असते. परंतु काश्मीरचे मुख्य धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या बशीरुद्दीन यांनी या मुलींमुळे इस्लामला धोका निर्माण झाल्याचे सांगत या मुलींनी मर्यादा पाळत बुरख्यातच राहायला हवे, असा सल्ला दिला. त्यांच्या मते, मुली अशा बाहेर चारचौघात जाऊ लागल्याने त्यांच्याविरोधात अत्याचार वाढू लागले आहेत. त्यात या अशा गाऊ लागल्या, तर चित्रपटातील नायिका आणि या मुलींत फरक तो काय, असाही प्रश्न या महाशयांना पडला आहे. इस्लामला अशा प्रकारचे संगीत मंजूर नाही, असे त्यांचे म्हणणे. परंतु इस्लाम जन्माला आला तेव्हा असे संगीत होते का, असे त्यांना कोणी विचारले काय? संगीतास विरोध असल्यास मग हे धर्मगुरू अमीर खुस्रो याचे काय करणार? अमीर खुस्रो हिंदुस्थानी संगीताचा जनक मानला जातो. या मंडळींच्या असहिष्णुतेची अमर्यादा लक्षात घेतल्यास ते खुस्रो यास काफर ठरवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत आणि गालिब आदी मंडळींच्या तर त्यांनी मुसक्याच आवळल्या असत्या. तेव्हा धर्मगुरूनेच विरोध केल्याने या मुलींविरोधात वातावरण चांगलेच तापले, त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि काहींची मजल तर त्यांच्यावर बलात्कार केला जाईल, असे इशारे देण्यापर्यंत गेली. अशा वातावरणात कोणत्याही शहाण्या माणसास जितके असहाय वाटते तितकेच या मुलींनाही वाटले आणि त्यांनी आपला वाद्यवृंद प्रयोग गुंडाळून टाकला. त्यानंतर त्या राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना जाग आली आणि त्यांनी या धर्मगुरूंचा निषेध केला. हे मुख्यमंत्री आधुनिक म्हणून ओळखले जातात. उच्चविद्याविभूषितही आहेत ते. इंटरनेट, ट्विटर आदी आधुनिक जगाची माध्यमे ते वापरतात. परंतु तरीही त्यांची मजल या धर्मगुरूंचा निषेध केवळ ट्विटरवरून करण्यापर्यंतच गेली. काश्मीरला संगीताचा वारसा आहे असे या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवरील चर्चेत सांगितले आणि धर्मगुरूंची कृती अयोग्य असल्याचे ठासून नमूद केले. परंतु पुढे काय? तर काहीही नाही. या उच्चविद्याविभूषित इस्लामी तरुण मुख्यमंत्र्यास असे वाटले नाही की या थोतांड धर्मगुरूवर कारवाई करावी आणि ज्यांनी ज्यांनी या मुलींना धमक्या दिल्या त्यांच्यावर कायद्याचा बडगा उभारावा. कारभारातील अनागोंदीच्या बाबतीत हे ओमर आपले तीर्थरूप फारूख अब्दुल्ला यांच्याशीच स्पर्धा करताना दिसतात. काश्मीर जळत असताना थोरले फारूख अब्दुल्ला युरोपात गोल्फ खेळण्यात धन्यता मानत. धाकटे फारूख ट्विट करतात इतकाच काय तो फरक. मुळात काश्मीरचे मुख्य धर्मगुरू असे काही विशिष्ट पद नाही आणि असले तरी असल्या धर्मगुरूस बखोट धरून तुरुंगात डांबले जायला हवे. या मुलींच्या धाष्टर्य़ाची, त्यांच्या कलासक्ततेची तारीफ सगळय़ांनीच केली. परंतु अतिरेकी इस्लामी धर्मगुरूंपासून त्यांना वाचवण्यासाठी कोणीच पुढे येताना दिसत नाही. एरवी निधर्मीवादाची पुंगी वाजवत टीव्ही चॅनेल्यांचे उंबरठे झिजवणारे विचारवंतही या काश्मिरी धर्ममरतडांचा सक्रिय निषेध करताना दिसत नाहीत. कोणत्याही धर्माचा असा निलाजरा एकारलेपणा वाईटच. मग तो हिंदू असो वा इस्लाम. परंतु आपल्याकडील हे तथाकथित बुद्धिवंत हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांचा निषेध करण्यासाठी जेवढय़ा अहमहमिकेने पुढे सरसावतात तेवढीच त्यांची जीभ इस्लामातील वाईट प्रवृत्तींचा निषेध करण्याची वेळ आली की टाळूस चिकटते. एखाद्या पंडिताने वा हिंदू धर्मगुरूने असा अगोचरपणा केला असता तर मेणबत्ती संप्रदायही मोठय़ा प्रमाणावर निषेधासाठी बाहेर पडला असता आणि चॅनेलचर्चेचे फड जोरजोरात रंगले असते. काश्मिरातील इस्लामी धर्मगुरूंबाबत मात्र सर्वानीच मौन बाळगलेले दिसते. या त्यांच्या लबाडीस काय म्हणावे? या मंडळींचे हे दुतोंडीपण अलीकडच्या काळात वारंवार पुढे येऊ लागले आहे. यातील बरेचसे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबतही गळा काढीत असतात. हल्ली विचारवंत वगैरे म्हणवून घेणारे अनेक सुमार पोपट पाकिस्तानात जाऊन येतात आणि भारताने शेजारी देशाशी मैत्री वाढवण्यासाठी काय करायला हवे याची शहाजोग वटवट करतात. भारतात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारामुळे या मंडळींचे हृदय द्रवते. परंतु पाकिस्तानात झपाटय़ाने कमी होत जाणाऱ्या अल्पसंख्याकांविषयी यांनी कधी चिंता व्यक्त केल्याचे आठवत नाही. भारताबरोबर पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हा त्या वेळी त्या देशात शीख, सिंधी आदी धर्मीयांचे प्रमाण २० टक्के इतके होते. पाकिस्तानी इस्लामी जनतेच्या तुलनेत अन्य धर्मीय आता तेथे दोन टक्के इतकेही नाहीत. परंतु पाकिस्तानच्या आठ-दहा दिवसांच्या दौऱ्यात तेथील शिरकुम्र्यास जागत हे बिर्याणीबहाद्दर त्या देशातील अल्पसंख्याकांच्या अवस्थेबाबत अवाक्षरही काढताना दिसत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानात राहून भारतातील मुसलमानांच्या सुरक्षिततेविषयी खोटेनाटे अo्रू ढाळणाऱ्यांना मग या मंडळींमुळे बळ येते. पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त मुसलमान राहतात आणि ते पाकिस्तानपेक्षा भारतातच अधिक सुरक्षित आहेत अशा शब्दांत यापैकी कोणी पाकिस्तानला ठणकावल्याचे दिसणार नाही. या साऱ्यातून या मंडळींच्या वैचारिक अप्रामाणिकपणापेक्षा लबाडीच अधिक दिसून येते. ही लबाडीही राजकीयदृष्टय़ा त्यांचे पुरोगामित्व मिरवण्यासाठी सोयीची असल्याने सगळय़ांचेच हितसंबंध राखले जातात.
काश्मीरच्या भूमीत जे काही घडत आहे, त्या निमित्ताने हे पुन्हा एकदा दिसून आले. गेल्याच आठवडय़ात इस्लामी मंडळींच्या विरोधामुळे सलमान रश्दी यांना कोलकोत्यात येण्यापासून प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रोखले. इस्लामी जनतेच्या भावना दुखावल्या जातील अशी भीती त्यांना वाटली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनाही अशीच भीती वाटली आणि त्यांनी कमल हासन याच्या सिनेमाचे प्रदर्शन रोखले. यातील एकाही प्रकरणाचा निषेध गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे वा माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी केल्याचे दिसले नाही. पंतप्रधानांच्या लाकडी व्यक्तिमत्त्वाकडून अशा जिवंत निषेधाची अपेक्षा नाही. परंतु हिंदू दहशतवादाविरोधात अलीकडे बोंब ठोकणारे चिदम्बरम आणि शिंदे हे काश्मीर वा तामिळनाडूतील अतिसंवेदनशील इस्लामी जाणिवांबाबत काही भाष्य करीत नाहीत, हे पुरेसे बोलके मानावयाचे काय? या सगळय़ात उजळून दिसले ते अर्थवेत्ते अमर्त्य सेन यांचे प्रतिपादन. मुसलमानांनी सलमान रश्दीचे काय होते वगैरेपेक्षा आपल्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, त्यांची त्यांना जास्त गरज आहे, अशा शब्दांत सेन यांनी आपली भूमिका मांडली. बोटचेप्यांच्या गर्दीत सेन त्यामुळेच उठून दिसले.
याचे कारण हे की, इस्लामला खतरा असलाच तर तो अतिरेकी धर्मगुरू आणि भंपक निधर्मीवादी यांच्याकडूनच अधिक आहे. इस्लामची इभ्रत राखायची असेल तर हे आधी मान्य करायला हवे.




















‘घटना व कायदे’ श्रेष्ठ मानायचे की ‘धर्म व त्यानुसार असलेल्या धार्मिक प्रथा’, ते एकदाचं ठरवून टाकण्याची वेळ आलेली आहे. परंतु एक रास्त शंका वाटते आणि ती म्हणजे भारतीय घटना व काय्देप्रणाली जशीच्या तशी काश्मीरला लागू आहे का? कारण काही दिवसांपूर्वी ह्याच वृत्तपत्रातील एका लेखात असे वाचनात आले होते की काश्मीर भारताचा भाग नाही पण भारताच्या बरोबर असलेले एक राज्य आहे म्हणून. पण कोणीतरी पाकिस्तानच्या नाकाने कांदे सोलणाऱ्या नेत्यांना ठणकावून विचारायला हवेय की १९४७ पासून आजपर्यंत २०% वरून २% इतकी कमी कशी झाली अल्पसंख्यांकांची संख्या ? पण मूग गिळून बसण्याची परंपरा असणारे आपले शूर नेते तोंड उघडतील असे अजिबात वाटत नाही. त्यांची धाव फक्त भारतातील अल्पसंख्यांकापर्यंतच. कुंपणाच्या पलीकडे जायची हिम्मत अजूनपर्यंत तरी दिसली नाही. तशी वेळ अगदीच आलीच तर चटकन रंगच बदलतात असेच दिसलेय.
चूक ते चूक, बरोबर ते बरोबर. कोण म्हणतो यापेक्षा काय म्हणतो यावरून ते चूक किंवा बरोबर ठरते. मनुष्याच्या अधिकारावरून मात्र त्याची intensity ठरते. दुर्दैवाने सध्या आपल्या देशात, कुठलीही गोष्ट ही context sensitive झाली आहे आणि context हा राजकारणाचा आहे. कधी खाप पंचायत, कधी विश्वरूपम, कधी सिंगूर तर कधी कश्मीर. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियेलें नाही बहुमता असे आमचे कधी होणारं? माझे ते सत्य यापेक्षा सत्य ते माझे असा विचार समाज मनात रुजविणे आवश्यक आहे. या दृष्टीने हा अग्रलेख उत्तम आहे. पण याच लेखात म्हणाल्या प्रमाणे ढोंगी विचारवंत यातून काही बोध घेतील असे वाटत नाही.
खोट्या धर्मनिरपेक्षते च्या बुरख्या आड लपणाऱ्या बिर्याणीबहाद्दरांना आपण खडे बोल सुनावले आहेत. गेले अनेक वर्ष अगदी शाहबानो केस पासून मुस्लीम लांगूलचालन करण्याची निकोप स्पर्धा आपल्या काही राजकीय पक्षात लागली आहे, त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू कट्टरतावाद वाढत आहे हे हि सत्य आहे.पण ह्याला कारणीभूत, मतांवर लक्ष ठेऊन समाज आणि राष्ट्रहिताच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणारे राजकारणी आहेत.एका बाजूला मलाला ला नोबेल शांती पुरस्कारासाठी मानांकन मिळत असताना आणि काश्मीर सारख्या राज्यातील युवती एक चांगला प्रयत्न करताना राज्य सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे त्या उलट सरकार मुलतत्ववाद्यांच्या धमकीला बळी पडले आहे असे वाटते.
हाच खरा अग्रलेख. सगळी घुसमट बाहेर काढणारा. धर्मांधतेची परिसीमा गाठणाऱ्या कृती मुस्लिम मौलवींकडून/नेत्यांकडून मागील कित्येक दिवसांपासून केली जात होत्या आणि कोणीही त्याविरुद्ध काहीही बोलत नाही हेच आश्चर्य आहे. काही बोललं की आपण हिंदू कट्टरता जपतोय की काय अशी शंका येते.
१. आसाम मध्ये दंगल झाली आणि मुंबई मध्ये धर्मांध देशद्रोही मुस्लिमांनी “शहीद जवान” स्मारकावर प्रहार केला पोलिस स्त्रियांचा विनयभंग केला तरीही सगळे शांत.
२. निजामाने स्थापन केलेल्या आणि रझाकारांसारखे क्रूर अपत्ये जन्माला घालणाऱ्या MIM पक्षाच्या नेत्यांकडून अतिशय हीन दर्जाची विधानं करण्याऱ्या नेत्यांविरुद्ध कोणीही आवाज उठवला नाही. तेच विधान कोण्या हिंदुकडून झालं तर सगळी चवताळलेल्या कुत्र्यासारखी अंगावर येतात.
३. काश्मीरचा आताचा मुद्दा असो किंवा विश्वरूपमचा वाद असो इथे इस्लामच्या भावना कशा दुखावल्या जातात कोणास ठाऊक?
ही बेगडी निधर्मी वृत्ती महागात पडून पाकिस्तान ची निर्मिती झाली आणि भारताची ४ पैकी ३ युद्धे काश्मीरसाठी झाली. तरीही आपण परत तिथेच येतो. कॉंग्रेस मुस्लिम मतांच्या लाचारीसाठी हिंदू कट्टरपणाला खतपाणी घालत आहे.
Hidden due to low comment rating. Click here to see.
इस्लामच्या इभ्रतीच्या नावाने गळे काढण्यासाठी इतरत्र पहायची गरज नाही. आदल्या संपादकांच्या वेळचे अग्रलेख, विशेष लेख वाचले असते, तरी या मांदियाळीत कोण कोण आहे ते कळले असते. आधीच्या संपादकांनी आणि त्यांच्या तत्कालीन पित्तूनी लोकसत्ताचा भरपूर फायदा उचललेला आहे. ते महोदयदेखिल साफमा संस्थेचे सभासद असल्यामुळे पाकिस्तान म्हणजे भारत आणि विशेषत: भाजप आणि संघाने उगीचच खोटे आरोप लावलेला भारतप्रेमी निष्पाप प्राणी असा लोकांचा समज ठेवून लिखाण केले होते. एक जुने पत्रकार श्री. प्रकाश अकोलकर यांनी या संपादकांचा बुरखा फाडणारा सुंदर लेख अक्षरच्या २०१२च्या दिवाळी अंकात लिहिला आहे.
साम वेद हे भारतीय संगीताचे जनक आहेत, आमिर खुस्रो नाही. पुढे नारद, भरत, पाणिनी, सारंग देव, मातंग, यांनी त्यात अनेक ग्रंथ लिहून भर टाकली.
अत्यंत परखड लेख! तुमच्या ह्या लेखामुळे तथाकथित “विचारवंतांच्या” चांगलीच चपराक बसली आहे. हे अगदी खरय कि निधर्मीपणाच्या नावाखाली इस्लामी अतिरेकाचे जास्तच लाड होत आहेत, ज्याने धार्मिक तेढ अजूनच वाढेल ह्यात शंका नाही. काँग्रेसवाले हे घाणेरडे राजकारण करणारच, अजून काय अपेक्षा करणार त्यांच्याकडून? पण ह्या बुद्धीजीवींचे काय? हिंदू असले कि दहशतवाद आणि इस्लाम म्हटले कि त्यांना सहानुभूती. हे थांबायलाच हवे. गेल्या काही तुम्ही सांगितलेल्या घटनांवर ह्यांनी स्वतःचे विचार का मांडले नाहीत?