संपादकीय
- अग्रलेख
- विशेष लेख
- अन्वयार्थ
- चैतन्य चिंतन
- लाल किल्ला
- कलाभान
- सह्याद्रिचे वारे
- राखेखालचे निखारे
- व्यक्तिवेध
- गल्लत , गफलत , गहजब !
- राजधानीवर मराठी मोहोर
- जमाखर्च राजकारणाचा
- आज..कालच्या नजरेतून
- बुकमार्क
- वार्ता ग्रंथांची
- बुक-अप!
- बुक - वर्म
- लोकमानस
- अन्यथा
- रविवार विशेष
- भवताल
- रुजुवात
- आकलन
- वाचावे नेटके
- पसायधन
- प्रसार-भान
- ग्रंथविश्व
- आनंदयोग
- ई-लोकमानस
- अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- पीएच.डी. सर्वात सोपी!
- हे राज्य ही तो बिल्डरांची इच्छा!
- सचिन चालिसा!
- वापरलेलं...
मोस्ट रीड
क्रिकेट नियामक मंडळ ही भारताची म्हणून अशी राष्ट्रीय क्रिकेट संघटना नाही. तिच्या खांद्यावर राष्ट्रवादाची झूल चढवणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करण्यासारखे आहे. गेली कित्येक वर्षे आपण ही फसवणूक करून घेत आहोत आणि त्यामुळे या मंडळींचे अधिकच फावत आहे.
क्रिकेटच्या खेळात खिलाडू म्हणता येईल असे काहीही राहिलेले नाही, यात काही नवीन नाही. मक्तेदारी प्रतिबंधक आयोगाने गेल्या आठवडय़ात क्रिकेट नियामक मंडळास ५२ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याने हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून त्याचे आकलन आपणास होणे गरजेचे आहे. हाताबाहेर गेलेले बाजारीकरण आणि त्यातून आलेला अफाट पैसा यामुळे, एके काळी सभ्य मंडळींचा खेळ असे ज्याचे वर्णन केले जात होते त्या क्रिकेट सामन्यांची तुलना पूर्वीच्या काळातील जमीनदारांकडील कोंबडय़ा वा बैलांच्या झुंजींशीच करता येईल. क्रिकेट नियामक मंडळाकडून ही क्रिकेटची सर्कस चालवली जाते आणि त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकास मंडळास योग्य वाटेल त्या अटींवर सह्य़ा कराव्या लागतात. त्या एकदा केल्या की मग पळवाट नाही. त्यानंतर हे क्रिकेटपटू संस्थेच्या हातचे गुलाम होतात आणि कोणत्याही बाबतीत त्यांना नकाराधिकार राहत नाही. एका अर्थाने याबाबत क्रिकेटपटूंनाही दोष देता येणार नाही. जोपर्यंत खेळता येत आहे तोपर्यंतच कमावून ठेवावयाचे असल्याने त्यांना हे सहन करावे लागते आणि क्रिकेट मंडळ म्हणेल त्याप्रमाणे नाचावे लागते. भाबडय़ा जनतेस हे सर्व खेळाडू देशासाठी खेळतात असे वाटत असते. एकदा का देशप्रेम आणि राष्ट्रवाद आला की तर्कशुद्ध विचार मागे पडतो. आपल्यासारख्या क्रिकेटवेडय़ा देशात तर तो अधिकच मागे पडला आणि विचारशून्य समाजाने क्रिकेटपटूंना देवत्व बहाल करायला सुरुवात केली. देशाच्या इभ्रतीचा प्रश्न मैदानावरच्या २२ यार्डात काय चालले आहे याच्याशीच जोडला गेल्याने त्यामुळे सगळ्यांच्याच उन्मादात हवा भरणे सगळ्यांसाठीच सोयीचे झाले. अजूनही आपल्याकडे अनेकांना माहीत नसेल की, हे क्रिकेटपटू देशासाठी वगैरे खेळत नाहीत आणि क्रिकेट नियामक मंडळ ही भारताची म्हणून अशी राष्ट्रीय क्रिकेट संघटना नाही. तामिळनाडू राज्यात संस्था कायद्यानुसार नोंदली गेलेली ही एक खासगी संस्था आहे आणि तिच्या खांद्यावर राष्ट्रवादाची झूल चढवणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करण्यासारखे आहे. गेली कित्येक वर्षे आपण ही फसवणूक करून घेत आहोत आणि त्यामुळे या मंडळींचे अधिकच फावत आहे. एखाद्या अन्य कोणत्याही संस्थेने आपले व्यापार उद्योग करावेत तसेच हे व्यापार उद्योग क्रिकेट नियामक मंडळाकडून सुरू असतात. परंतु त्यांचे यश हे की या उद्योगास देशप्रेमाचा मुलामा देण्यात हे मंडळ यशस्वी झाले. क्रिकेट नियामक मंडळाची याबाबतची लबाडी ही की, ते बेमालूमपणे नियामक मंडळ असल्याचा आव आणते; परंतु प्रत्यक्षात केवळ फायद्याकडे डोळे ठेवून असणाऱ्या दुकानदारापेक्षा हे मंडळ मोठे नाही. वस्तुत: दुकानदार असणे काही गैर आहे असे नाही, परंतु क्रिकेटच्या या दुकानदाराची दादागिरी ही की अन्य कोणाही दुकानदाराने क्रिकेटचे दुकान मांडायचे नाही असा त्यांचा आग्रह असतो आणि वागणेही तसेच असते. मंडळास आता दंड झाला आहे तो याच क्रिकेटवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याच्या मानसिकतेमुळे. अन्य कोणत्याही संस्थेने क्रिकेटचे सामने भरवायचे नाहीत, भरवले तरी कोणत्याही क्रीडा वाहिनीने ते टीव्हीवरून दाखवायचे नाहीत आणि तसे ते दाखवण्यास मनाई असल्याने प्रेक्षकांनी बघायचेही नाहीत. एखाद्या झोपडपट्टीत स्थानिक गुंडपुंडाने सर्व व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा तसे क्रिकेट नियामक मंडळाचे वर्तन राहिलेले आहे.
या दुकानाची एक शाखा आयपीएल नावाने सुरू झाली आणि त्याचा गल्ला अधिकच भरू लागला. इतके दिवस या मंडळाचा म्हणून स्वत:चा असा संघ असायचा. आयपीएलच्या निमित्ताने देशभरातील सधनांना आपापले संघ उभारण्याची मुभा क्रिकेट मंडळाने दिली. एखाद्या धनाढय़ाने आपल्या पदरी गवई, नाचे ठेवावेत तसे आता आपले उद्योगपती क्रिकेटपटू ठेवू लागले. क्रिकेटपासून होणाऱ्या मनोरंजनास अधिक बाजार मिळावा या हेतूने मग या उद्योगपतींच्या संघांत परस्पर झुंजी लावून देण्याची टूम निघाली. थेट मनोरंजनासाठी हपापलेल्या टीव्ही वाहिन्यांनाही हे हवेच होते. एक्स्प्रेस समूह वा असा एखादा सन्माननीय अपवाद वगळता अन्य वर्तमानपत्रांनीही या आयपीएलच्या सर्कशीचे स्वागत केले आणि वृत्तांकनास जाहिरातीचे दर लावून या क्रिकेटकुंभात हात मारून घेतले. परंतु क्रिकेट मंडळाच्या धर्तीवर इतरांनीही असाच प्रयत्न करून आयपीएलप्रमाणे वेगळ्या सर्कशीचे आयोजन करण्याचे प्रयत्न केल्यावर मात्र मंडळातील धुरिणांचे पित्त खवळले. क्रिकेटच्या पिंडास आपण सोडून कोणत्याही कावळ्याने चोच लावायची नाही, अशी या मंडळाची वृत्ती. नवी दिल्ली येथील सुरिंदर सिंग बरमी नामक व्यक्तीने मंडळाच्या या मक्तेदारी वागणुकीस आव्हान दिले आणि त्यात मंडळाची माझे ते माझे आणि तुझे तेही माझे, ही वृत्ती दिसून आली. मक्तेदारी प्रतिबंधक आयोगाने या वागण्याबद्दल क्रिकेट नियामक मंडळावर कठोर टीका केली आणि ५२ कोटींचा खणखणीत दंड लगावला. अर्थात मंडळासाठी ५२ कोटी रुपयांची रक्कम अगदीच चिरीमिरी म्हणायला हवी. ती तर ते काय अनेकांवर वाटत असते. परंतु यामुळे मुद्दा समोर आला तो क्रिकेट या खेळावरील मंडळाच्या मक्तेदारीचा. ही खेळावरची मक्तेदारी अत्यंत गंभीर आहे आणि ती मोडून काढायला हवी, अशा प्रकारचे मत आयोगाने आपल्या आदेशात नोंदवले आहे, ते त्यामुळेच महत्त्वाचे आहे. याचे कारण असे की आपण नक्की कोण आहोत, या प्रश्नावर मंडळाची भूमिका कायम स्वत:स सोयीची अशीच राहिलेली आहे. हे मंडळ कधी क्रिकेटची नियामक यंत्रणा म्हणवते तर कधी खासगी क्लब. सरकारने अथवा अन्य कोणी माहिती अधिकाराच्या अंतर्गत कोणतीही माहिती मागितली तर ती देणे बंधनकारक नाही अशी मंडळाची भूमिका असते आणि अशा वेळी ते स्वत:स खासगी क्लब जाहीर करते. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या परिघात येणे या मंडळास मान्य नसते. याही उपर अन्य कोणा आयोजकाने क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाही मान्यता न देण्याचा मस्तवालपणा या मंडळाने दाखवलेला आहे. 'क्रिकेट मंडळाच्या या हम करें सो कायदा या वृत्तीमुळे अनेक क्रिकेटपटूंचे नुकसान होत असून त्यांना खेळण्यासाठी, कौशल्य सिद्ध करण्यासाठी पर्यायच तयार होऊ दिला जात नाही,' इतक्या कडक शब्दांत आयोगाने मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले. आयपीएलच्या धर्तीवर अन्य कोणास तशाच स्पर्धा भरवण्याचा अधिकार असायला हवा, अशा स्वरूपाची मागणी सुरिंदर सिंग यांनी केली होती. खेळातून आलेल्या धनसंपत्तीमुळे मंडळास अमर्याद अधिकार हाती आले आहेत, त्यामुळे कोण काय करणार हे ते स्वत:च ठरवते याबद्दलही आयोगाने नाराजी व्यक्त केली.
त्यामुळे अर्थातच यात काही सुधारणा होईल असा भाबडेपणा बाळगण्याचे काहीच कारण नाही. क्रिकेट संघटना.. किंबहुना ज्यात पैसा आहे त्या सर्वच खेळांच्या संघटना.. या आता राजकीय धेंडांची कुरणे बनलेल्या आहेत. अशा छोटय़ा-मोठय़ा निर्णयाने त्यांच्यात ढिम्म फरक पडणार नाही. या सर्व संघटनांना उत्तरदायी बनवणे, माहिती अधिकाराखाली आणणे हाच यावरील मार्ग असू शकतो. आम्ही कोणाचेच ऐकणार नाही, इतके सर्वाधिकार लोकशाहीत कोणालाच असता नयेत. या आणि अशा क्रीडा संघटनांना तर ते मुळीच नकोत. कारण इतके दिवस राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असे मानले जायचे. आता क्रीडा संस्था या असे अड्डे बनल्या आहेत.




















क्रिकेटच्या वेडापायी आपले वैयाक्क्तिक नुकसान करून घेणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणारा अग्रलेख आहे. गेल्या वीस एक वर्षापासून क्रिकेट हा खेळ न राहता त्याचे व्यापारीकरण झाले आहे. त्यात शरद पवारांसारखा जेव्हा मदारी होतो तेव्हा तालावर नाचणाऱ्या माकडांची कमी कशी भासणार ? क्रिकेटमधील पैशाचा अंदाज आल्यावर या सगळ्यांनी त्यात उडी घेतली , म्हणून भिकारी “किंगफिशर” क्रिकेटपटू विकत घ्यायला लिलावात बोली लावतो. अनेक कामगारांना देशोधडीला लाऊन हा जुगाराच्या मैदानात जोरात बोली लावतो. या सर्वाला सामान्य माणसाचे क्रिकेट चे अति वेड कारणीभूत आहे. एक चांगली गोष्ट हळू हळू घडत आहे कि लोकांच्या हे लक्षात येत आहे , आणि म्हणून क्रिकेटची मैदानं रिकामी दिसू लागत आहेत.यात क्रिकेटच नुकसान होणार आहे. क्रिकेट मधील वाईट प्रकार थांबण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुरिंदर सिंग यांचे अभिनंदन करायला पाहिजे.
हा उगाचरपणा
मागच्या आठवड्यातील महिला विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याच्या बातमीचा लोकसत्तातील मथळा होता “आता लंकादहन”. आपण म्हणता क्रिकेट हा सभ्य लोंकाचा खेळ आहे. मग या सभ्य लोन्कांच्या खेळात हा मथळा योग्य आहे, असे आपणास वाटते. आयपील च्या ६ व्या स्पर्धेचा लिलाव नुकताच पार पडला. आपण लोकसात्तातून पहिले पण तसेच क्रीडा पानभर जागा दिली. आणि त्याच दिवशी महिला विश्वाचाशाकातील भारताच्या पराभवाची बातमी एका कोपर्यात दिली. आणि आपणच म्हणता महिला क्रिकेट खेळाडूना वाव मिळावयास हवा. क्रिकेट खेळाडूवर अग्रलेख लिहिता. आयपील सातत्याने खेळणाऱ्या क्रिकेट खेळाडू सचिन तेंडूलकर वर आपण विशेष स्पर्धा घेता. आणि वरून असे अग्रलेख लिहून वाचाकामध्ये भ्रम निर्माण करता. हा उगाचरपणा बारा नव्हे.
मुळात आयपीएल ही स्पर्धा Indian Cricket League (I.C.L.) ला तोडीस तोड म्हणून सुरु करण्यात आली होती. शरद पवारांसारखे नेते,क्रिकेट बोर्डाचे अधिकारी व देशातील नामांकित उद्योगपती अशी भक्कम युती झाल्यावर आयपीएलचा जन्म झाला. त्याला पहिला अपशकुन केला तो ललित मोदीसारख्या हिंस्त्र,दुष्ट माणसाने.आयपीएलमधील उद्योगपतींच्या यादीकडे जर नजर टाकली तर आदराने घ्यावे असे एकही नाव नाही.सहाराचे सुब्रतो रॉय काय,कोलकाता नाईट रायडर्सचे तोडी काय;कोची संघाचे बदनाम गायकवाड कुटुंबीय व त्यांच्या पाठीशी उभे असलेले शशी थरूर काय,सध्या डबघाईला आलेला डेक्कन समूह काय,मुकेश आणि नीता अंबानी काय,सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला डीएलएफ समूह काय आणि सर्वात शेवटी अत्यंत बदनाम असा किंगफिशर विजय मल्या काय; ही सारी मंडळी व त्यांची मांदियाळी कशाची बरं निदर्शक आहेत ?
आहे कोणाची हिम्मत ह्या बदमाशांचे अड्डे उध्वस्त करण्याची ?
शेवटी एकचं खरे,आता बापूंचा भारत जाऊन दाऊदचा भारत आला आहे !