नोबेल पुरस्कारसाठी ज्याचे नाव सर्वाधिक चर्चेत असते, त्याला ते सहसा मिळत नाही. तसेच या वर्षी मॅन बुकरचे झाले. या पुरस्कारासाठी सर्वाधिक चर्चेत होती, झुम्पा लाहिरी यांची ‘लोलँड’ ही कादंबरी. पण पुरस्कार मात्र वय वर्षे २८ असलेल्या एलिनॉर कॅटनच्या ‘ल्युमीनरीज’ला मिळाला. ही कादंबरी तिने वयाच्या २७व्या वर्षी लिहिली. ती ‘ग्रँटा’ मासिकाने या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रकाशित केली आणि ऑक्टोबरमध्ये तिला बुकर जाहीर झाले.
कॅटनची ही दुसरी कादंबरी. वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिची   ‘द रिहर्सल’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. कॅटनने क्रिएटिव्ह रायटिंग या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
२००७ पासून आतापर्यंत कॅटनला मिळालेला हा आठवा पुरस्कार. एकंदर कादंबऱ्या दोन आणि काही कथा, एवढीच तिची ग्रंथसंपदा. २००९ साली ‘धीस इयर्स गोल्डन गर्ल ऑफ फिक्शन’ असं कॅटनचं वर्णन केलं गेलं. पण एकंदर ही तरुण कादंबरीकार मोठा पल्ला मारणार, असे दिसते आहे.
फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
एक्स अ ट्विस्टेड लव्ह स्टोरी : नोवोनील चक्रबोर्ती, पाने : २९६१५० रुपये.
लॉकवुड अँड कं.- द स्क्रिमिंग स्टेअरकेस : जोनाथन स्ट्रॉॅड, पाने : ४९४५५० रुपये.
द लोलँड : झुम्पा लाहिरी, पाने : ३५२४९९ रुपये.
मॉम इन द सिटी : कौशल्या सप्तऋषी, पाने : ३४४२५० रुपये.
द टिडेस ऑफ मेमरी : सिडनी शेल्डन, पाने : ४००२९९ रुपये.
टॉप  ५ नॉन-फिक्शन
गांधी बिफोर इंडिया : रामचंद्र गुहा, पाने : ६८८८९९ रुपये.
माय जर्नी : ए.पी.जे. अब्दुल कलाम, पाने : १६०१९५ रुपये.
द लाइफ अँड टाइम्स ऑफ कृष्णा : जे. बी. पॅट्रो, पाने : ४७८/४९५ रुपये.
द इन्गिमा दॅट इज पाकिस्तान : शिवेंद्र कुमार सिंग, पाने : १५२१४० रुपये.
द फर्म-द स्टोरी ऑफ मॅकन्झी : डफ मॅकडोनाल्ड, पाने : ४००५९९ रुपये.