विकास स्वरूप हे नाव आपल्याला माहीत आहे ते त्यांच्या तुफान गाजलेल्या ‘क्यू अ‍ॅण्ड ए’ या कादंबरीमुळे. मुंबईतील झोपडपट्टीत राहणारा मुलगा एका प्रश्नमंजूषेच्या कार्यक्रमात सर्वच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन लक्षाधीश होतो, याची कथा सांगणारी ही कादंबरी. पुढे याच कादंबरीवरून निर्मित झालेल्या ‘स्लमडॉग मिलिनिअर’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारांवर ठसा उमटवला. हेच स्वरूपजी  आता  मोदी सरकारचा परराष्ट्र धोरणाचा चेहरा असतील, म्हणजे त्यांची नियुक्ती परराष्ट्र प्रवक्तेपदी झाली आहे.
 विद्यमान प्रवक्तेसईद अकबरुद्दीन यांना आता पदोन्नती देण्यात आली आहे. येत्या १८ एप्रिलपासून स्वरूपजी नव्या जबाबदारीला सुरुवात करतील.  दिल्लीतच सध्या ते परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त राष्ट्र संघाचे सहसचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. १९८६च्या भारतीय परराष्ट्र सेवेच्या तुकडीतील स्वरूप यांनी आतापर्यंत अमेरिका, इंग्लंड, जपान आणि आफ्रिका या देशांमधील भारतीय दूतावासांत विविध पदांवर काम केले आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील रहिवासी असलेल्या स्वरूप यांच्या घरात वकिली व्यवसायाचा पगडा भारी. साहजिकच शालेय-महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकासही त्याच मळलेल्या वाटेवरून जातील, अशी घरच्यांची अटकळ होती. मात्र, विकास यांनी थेट भारतीय परराष्ट्र सेवेचा मार्ग निवडला.  बुद्धिमत्तेबरोबरच त्यांना लेखनाचे अंगही आहे. ‘क्यू अ‍ॅण्ड ए’बरोबरच त्यांनी ‘सिक्स सस्पेक्ट्स’ आणि ‘द अ‍ॅक्सिडेंटल अ‍ॅप्रेंटिस’ या दोन कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यातील अ‍ॅक्सिडेंटल अ‍ॅप्रेंटिस या कादंबरीवर आधारित कदाचित या वर्षीच चित्रपट प्रदíशत होण्याची शक्यता आहे. आपल्या लेखनशैलीचे वर्णन विकास स्वरूप यांनी अगदी नेमक्या स्वरूपात केले आहे. परराष्ट्र सेवेत असल्याने अनेक देशांमध्ये मुत्सद्दी म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होत असते. अगदी मोजून-मापून शब्द वापरावे लागतात. इकडचा शब्द तिकडे झाला तरी द्विपक्षीय संबंधांमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच कादंबरी लिहितानाही या सवयीचा उपयोग होतो आणि त्यातून भारताचे खरेखुरे चित्र नीट रेखाटता येते, असे स्वरूप म्हणतात. परराष्ट्र खात्यातील प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळतानाही ते याच सवयीचा उपयोग करतील, यात तिळमात्र शंका नाही.

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप