कलकत्त्याच्या ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’मधील प्रशिक्षणादरम्यान बाबा आमटेंची राहण्याची सोय कलकत्त्याच्या सोदपूर येथील एका आश्रमात झाली होती. स्कूल तिथनं १२ मलांवर होतं. बाबांना रोज लोकल ट्रेनने येणं-जाणं करावं लागत असे. आश्रमाच्या नियमांनुसार पहाटे साडेतीनला उठणे, चारला प्रार्थना, नंतर स्नानादी र्कम, तासभर अभ्यास, वाचन, मग स्वत: स्वयंपाक बनवणे, जेवण आटोपून ट्रेन पकडणे, स्कूलमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळात प्रशिक्षण, संध्याकाळी परतीचा प्रवास, आश्रमाची प्रार्थना, जेवण आणि रात्री आठला झोप असा त्यांचा धकाधकीचा दिनक्रम होता.

कलकत्त्याला आल्यापासून एकीकडे बाबांना कफ, डोकेदुखी, पोटदुखी अशी निरनिराळी दुखणी सतावत होती आणि दुसरीकडे त्यांचा जीव आम्हा तिघांमध्ये अडकला होता. त्यांची आणि इंदूची पत्रापत्री सुरू असे. इंदूच्या पत्रातून माझ्या आणि प्रकाशच्या गमतीजमती बाबांच्या डोळ्यासमोर उभ्या राहत आणि आमच्या भेटीसाठी ते व्याकूळ होत. त्यांना खूप लिहावंसं वाटे. पत्रातून आपला एकटेपणा घालवण्याचा ते प्रयत्न करत. पण त्यांना उजव्या खांद्यात प्रचंड दुखणं असल्याने लिहिणंच काय, रोजची स्वत:ची कामं करणंही कठीण होऊन बसलं होतं. (१९३५ साली क्वेट्टा येथील भूकंपग्रस्तांच्या मदतीला ट्रेनने जात असताना भूकंपानंतरचे धक्के (aftershocks) बसल्याने ट्रेन गदागदा हलली. त्यामुळे वरच्या बर्थवरील एक मोठ्ठी लोखंडी ट्रंक जागची हलत खालच्या बर्थवरील जोडप्यावर पडणार हे लक्षात येताच बाबांनी ती ट्रंक स्वत:च्या उजव्या खांद्यावर झेलली. ते जोडपं तर बचावलं, पण बाबांच्या खांद्याच्या हाडांचा अक्षरश: चुरा झाला. इतका, की डॉक्टरांनी त्यांचा उजवा हात कदाचित कलम करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त केली. सुदैवाने पारंपरिक उपचार पद्धतीने ही वेळ तर टळली; पण पुढे आयुष्यभर बाबांना ‘Frozen Shoulder’च्या या दुखण्यामुळे अंगमेहनतीची कामं करताना कायमची बंधनं आली. अर्थात बाबांनी ही बंधनं कधीच पाळली नाहीत, हा भाग वेगळा!) तरीसुद्धा प्रशिक्षणादरम्यान होणाऱ्या सगळ्या गोष्टी बाबा इंदूला पत्रातून कळवत असत. बाबा जे शिकत होते, त्यांना जी काही नवीन माहिती मिळत होती, ती सगळी बाबा इंदूसोबत शेअर करायचे.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

यादरम्यान लिहिलेल्या एका पत्रात बाबांनी तेव्हा चालू असलेल्या कुष्ठरोगाबाबतच्या संशोधनाबद्दल सांगत असताना स्वत:वर केलेल्या एका अचाट प्रयोगाविषयी इंदूला लिहिलं. एक दिवस वर्गात चच्रेला विषय होता- ‘Artificial breeding of Leprosy germs.l म्हणजे ‘कुष्ठरोगाच्या जिवाणूंचं कृत्रिमरीत्या प्रजनन करणं’! मात्र, कुठलाही रोग एका विशिष्ट जिवाणूच्या संसर्गामुळे होतो, हे निश्चित करण्यासाठी संशोधकाला तीन मूलभूत गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक- रोगाने बाधित प्रत्येक रोग्याच्या शरीरात हा जिवाणू सापडायला हवा. दुसरं- हा जिवाणू प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या प्रजनन (Pure Culture) करून वाढवता यायला हवा. आणि तिसरं- कृत्रिमरीत्या प्रजनन करून वाढवलेले जिवाणू अवयवयुक्त परिपूर्ण जीवाच्या (Organism) शरीरात घातले तर त्याला हा रोग व्हायला हवा व नंतर त्याच्या शरीरातून हे जिवाणू काढून गोळा करता यायला हवेत. सर्व रोगजंतूंबाबत हीच प्रक्रिया असते.

डॉक्टर धर्मेद्र यांनी प्रशिक्षणार्थीना सांगितलं, ‘‘कुष्ठरोगाच्या बाबतीत पहिली गोष्ट सहज सिद्ध झाली. कारण हा जिवाणू प्रत्येक रोग्यात आढळला. याची पुढची पायरी म्हणजे प्रयोगशाळेत ढ४१ी उ४’३४१ी करून त्यांची वाढ (Cultivation) होणं गरजेचं होतं. पण जेव्हा माकडं, उंदीर, ससे, घुशी आदी प्राण्यांना कुष्ठरोगाचे जिवंत जिवाणू टोचून त्यांची वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा कुठल्याच प्राण्याच्या शरीरात त्यांची वाढ होऊ शकली नाही. यासाठी झालेले आजवरचे सगळे प्रयत्न फसले आहेत.’’ डॉक्टर धर्मेद्र शेवटी म्हणाले, ‘‘Perhaps kManl is the only likely laboratory ‘Animal’!ll

डॉक्टरांनी हे विधान गमतीने केलं. पण या वाक्याने बाबांना झपाटून टाकलं. त्यांचं विचारचक्र सुरू झालं. माणसाच्या अंगात हे जिवाणू घालायचे म्हणजे भयंकरच जोखीम! पण जर प्रयोग यशस्वी झाला तर वैद्यकशास्त्रातली ती एक ऐतिहासिक घटना ठरेल. कुष्ठरोगाविरुद्धच्या लढाईतला तो एक मोठाच विजय ठरेल. पण असं आपणहून कुष्ठरोगाला बळी जायला कोण तयार होणार? झालं! दोन दिवस बाबा बचेन! त्यांच्यातले धाडसी, अचाट कृत्य करायला आसुसलेले बाबा जागे झाले आणि पेटून उठले. पुन्हा जेव्हा वर्ग भरला तेव्हा त्यांनी हात वर करत डॉक्टर धर्मेद्रना म्हटलं, ‘‘I wish to offer myself as a guinea pig! I shall do this for the advancement of medical science and for the benefit of leprosy patients.’’ डॉक्टर धर्मेद्र तर थक्कच झाले, पण सगळा वर्गही भेदरून बाबांकडे पाहू लागला. नंतर भानावर येऊन डॉक्टर म्हणाले, ‘‘प्रयोगासाठी इतर प्राणीही आहेत मिस्टर आमटे.’’ बाबा उत्तरले, ‘‘पण त्यांच्यावरचे प्रयोग फसले आहेत असं आपणच परवा सांगितलंत ना?’’ त्यावर डॉक्टर अवाक् होत म्हणाले, ‘‘हो, पण ही जोखीम घेऊ नका तुम्ही!’’

ऐकतील ते बाबा कसले! दत्तपूर कुष्ठधामाचे डॉ. जोशी या प्रशिक्षणादरम्यान बाबांचे सहाध्यायी होते. बाबा त्यांना म्हणाले, ‘‘टोचा माझ्या शरीरात ते कुष्ठरोगाचे जिवंत जिवाणू.’’ त्यावर त्यांनी बाबांना स्वच्छ सांगितलं, ‘‘क्लासरूममध्ये तुम्ही हा बेफामपणा केलात तो केलात, पण मी तुमच्या प्रयोगात सहभागी होणार नाही.’’ मग बाबा एकटेच प्रयोगशाळेत गेले आणि कुष्ठरोगाच्या पॉझिटिव्ह केसेसमधून घेतलेल्या जिवंत जिवाणूंचं एक द्रावण तयार होतं ते त्यांनी स्वतच स्वतला टोचून घेतलं. दोन दिवस वाट पाहिली. पण काहीच घडलं नाही. प्रयोग फसला होता! डॉक्टर जोशींना मात्र हायसं वाटलं. ते बाबांना म्हणाले, ‘‘Though we are like brothers, I am not brother’s keeper in this respect! तुमचा हा प्रयोग फसला नसता तर साऱ्या मंडळींनी मला फैलावर घेतलं असतं. अन् माझं मन मला जन्मभर खात राहिलं असतं.’’

प्रयोग फसल्याचं बाबांना खूपच वाईट वाटलं. मात्र, अजून एक गोष्ट त्यांच्या मनाला लागली होती. ती म्हणजे त्यांनी हे सगळे उद्योग इंदूला न विचारता केले होते. कदाचित त्यांनी इंदूचा होकार गृहीत धरला असेल. त्यांना खात्री होती का, की जरी त्यांना कुष्ठरोग झाला तरी इंदू त्यांची सोबत नक्कीच करेल! पत्रातून हा सगळा प्रकार वाचल्यावर इंदूची काय अवस्था झाली असेल? असो.. बाबा असेच तर होते.

यादरम्यान त्यांचं खांद्याचं दुखणं खूपच बळावलं होतं. जवळपास सगळा अभ्यास झाला होता, पण बाबांना लेखी परीक्षा देता येईल की नाही, हा प्रश्न उभा ठाकला होता. त्यात भर म्हणून अशक्तपणा आल्यामुळे क्षयरोगतज्ज्ञांनी इतर अनेक तपासण्या करून, एक्स-रे काढून घ्यायला सांगितलं होतं. हे सर्व सुरू असतानाही बाबांनी रेटा लावत जिद्दीने परीक्षा दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्णही झाले. पण डॉक्टर नसल्यामुळे त्यांना सर्टििफकेट मिळालं नाही. सगळ्या डॉक्टर लोकांमधून हा एक वकील कुष्ठरोगाच्या उपचारांचा एक वेगळाच दृष्टिकोन घेऊन ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’मधनं बाहेर पडला.

याच काळात एकीकडे महारोगी सेवा समितीला कुष्ठकार्यासाठी जमीन मिळावी म्हणून बाबांचे सरकारदरबारी प्रयत्न सुरू होते. परंतु कलकत्त्याहून परत आल्यानंतर थोडय़ाच दिवसांत बाबांना टीबीसदृश्य लक्षणं दिसू लागल्याने त्यांना टीबी झालाय, हे चुकीचं निदान डॉक्टरांनी केलं आणि उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजच्या इस्पितळातील टीबी वॉर्डात भरती केलं. तिथे जवळपास महिनाभर बाबांची ट्रीटमेंट सुरू होती. पण बाबांना टीबी नसून ब्राँकीएक्टसिस हा फुप्फुसाचा आजार झालाय, हे काही निष्णात डॉक्टरांच्या नंतर लक्षात आलं. चुकीचं निदान झाल्याने टीबी वॉर्डात भरती झालेल्या बाबांना टीबीची लागण झाली नाही, हे सुदैवच!

तर, पुन्हा एकदा आमची सगळ्यांची ताटातूट झाली. त्या काळात बाबांनी इंदूला लिहिलेल्या पत्रात त्यांच्या मनाची अस्वस्थता दिसून येते. बाबा लिहितात, ‘‘इंदू, सर्व डॉक्टरांचं मत एकच- की खोकताना रक्त पडल्यामुळे मला वर्षभर अंथरुणावर पडून राहायला हवं. मानसिक श्रमसुद्धा नकोत. बापरे! वर्षभर? संस्थेचं कसं होणार? संस्थेचा सांभाळ इंदू आता तुलाच करायचाय. स्त्रिया मुलांचं योग्य संगोपन करू शकतात. ध्येय सांभाळू शकतात. तू तर माझं साक्षात् प्रेम, ध्येय, साधना, साध्य आहेस!’’ किती अढळ विश्वास होता दोघांमध्ये! आणि सुखद आश्वासक समजही. म्हणूनच दोघेही दोन भिन्न ठिकाणी, कठीण परिस्थितीला धर्याने आणि निग्रहाने तोंड देत सामोरे जात होते. या काळात सततच्या आजारपणामुळे हताश झालेल्या इंदू आणि बाबांना पुन्हा एकदा पूज्य विनोबाजींनी प्रेमानं आणि आपुलकीनं भरलेल्या आपल्या पत्राच्या माध्यमातून नवी उमेद दिली. त्यांनी लिहिलं होतं, ‘‘एखाद्याला क्षयाची भावना झाली आहे असं म्हणण्याची रीत आहे. मुख्य क्षय भावनेचाच असतो. देहाचा क्षय प्रतिक्षण होतच असतो. ज्याची भावना शुक्लपक्षातील चंद्राप्रमाणे उत्तरोत्तर वíधष्णू आहे, त्याला देहाची चिंता करायचं कारण नाही. परमेश्वराच्या मनात तुमच्याकडून अजून पुष्कळ सेवा करून घ्यायची आहे.’’

विकास आमटे vikasamte@gmail.com