ठाणे ग्रामीण येथे पदावर असताना वेश्या, बारगर्ल यांचे प्रश्नही डॉ. रश्मी यांना जवळून बघता आले. गरज पडली तेव्हा अशा मुलींना त्यांना घरात आसराही द्यावा लागला. त्या वेळी त्यावर आक्षेप न घेता सामाजिक भान असणाऱ्या पुरुषोत्तम यांचा रश्मी यांनी अशा प्रकारचं काम आणखी वाढवावं, असा आग्रह आहे. पती-पत्नीच्या नात्यात असं सामंजस्य असेल तर पत्नीची वाट अधिक सुकर होते. ठाण्याच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर आणि  त्यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्या नात्याविषयी..

‘‘रश्मी आता जे काम करतेय ते मला आवडतंच, पण तिने समाजासाठी आतापेक्षाही जास्तीत जास्त काम करावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं’’, ठाण्याच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांचे मितभाषी पती पुरुषोत्तम चव्हाण यांनी थोडक्यात व्यक्त केलेली ही अपेक्षा. या अपेक्षेमागची सामाजिक भावनाच गेली कित्येक र्वष दोघांनाही बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतेय.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव

रश्मी आणि पुरुषोत्तम कॉलेजमध्ये भेटले, तिथेच त्यांची मत्री झाली. पदवी मिळाल्यावर रश्मींना मंत्रालयात नोकरी मिळाली. खरं तर कोणत्याही मध्यमवर्गीय मुंबईकर तरुणीसाठी हा ‘ड्रीम जॉब’ होता. सरकारी नोकरी, बदलीचा ताण नाही, उलट बढतीच्या पायऱ्या चढून चांगल्या पदापर्यंत पोहोचण्याच्या संधी.. पण रश्मींची स्वप्नं वेगळी होती. किंबहुना त्यावेळच्या वीस-बावीस वर्षांच्या रश्मींना ही स्वप्नं पुरुषोत्तम यांनीच दाखवली होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दोघांनाही प्रशासकीय सेवेत जायचं होतं. त्यासाठी एमपीएससी-यूपीएससीची तयारीही सुरू होती. ‘‘..पण मला मंत्रालयाच्या नोकरीतून अभ्यासासाठी वेळच मिळायचा नाही. तेव्हा पुरुषोत्तमच्या यूपीएससीच्या नोट्सवरूनच अभ्यास सुरू होता. आमच्या कोर्टशिपमध्ये आम्हाला रोमान्स करायला सवड झालीच नाही. अभ्यासच इतका असायचा.’’ रश्मी त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देतात. तेव्हा सगळा वेळ अभ्यास करण्यात आणि त्याची चर्चा करण्यातच जायचा. अभ्यासाचे दिवस खडतर होते, सकाळी लवकर उठून लायब्ररीत अभ्यासाची तयारी. नंतर दिवसभर नोकरी केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा लायब्ररीत अभ्यास. तेव्हा रश्मी यांचा दिवसाचा ठरवलेला अभ्यास पूर्ण झालेला असावा अशी पुरुषोत्तमची अपेक्षा असायची. अभ्यास झाला नसेल तर ओरडा मिळायचा आणि झाला असेल तर बोराबाजारमध्ये जलेबी, फाफडा आणि अर्धा कप मलईचं दूध असा नाश्ता मिळायचा.

‘‘पुरुषोत्तमने माझ्याकडून अभ्यास करून घेतला नसता तर मी काहीही करू शकले नसते. भूगोल हा विषय मी घेतला होता. त्याच्या नकाशांसकट सगळी तयारी आधी पुरुषोत्तमने केली आणि मग माझ्याकडून करून घेतली.’’ रश्मी सांगतात. याच पाठिंब्याच्या जोरावर रश्मी यांनी पुढे नोकरी सुरू असताना सामाजिक मानववंशशास्त्र शाखेचा अभ्यास करीत डॉक्टरेट मिळवली.

एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र, प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न बाजूला ठेवायला लागलं. त्या वर्षी डेप्युटी कलेक्टरची जागाच नव्हती. त्यामुळे पोलीस उपअधीक्षकाचा पर्याय निवडला. त्यावर आईची पहिली प्रतिक्रिया होती, ‘‘गेल्या सात पिढय़ांत आपल्या घरात कोणी पोलीस झालेले नाही,’’ पण आता या पदासाठी नकार दिलास, तर स्त्रियाच अशी पदे घेण्यात मागे पडतात, असा संदेश जाईल, असं पुरुषोत्तम यांनी रश्मीच्या लक्षात आणून दिलं. आईचा विरोध बाजूला सारून रश्मीची वाटचाल सुरू झाली. या परीक्षेनंतर आयुष्याचा मार्ग बदलला. आधी नाशिकमध्ये प्रशिक्षण, त्यानंतर रत्नागिरीमध्ये प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण. २००५ मध्ये रत्नागिरीमध्ये हे प्रशिक्षण सुरू असतानाच रश्मी आणि पुरुषोत्तम यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गंमत म्हणजे रश्मी यांनी लग्नासाठी फक्तएका दिवसाची कॅज्युअल लीव्ह घेतली. सकाळी नवरी मुलगी मुंबईला पोहोचली, रजिस्टर्ड पद्धतीनं लग्न झालं आणि रात्रीच्या गाडीने परतणाऱ्या पोलीस नवरीला बसवून द्यायला खुद्द नवरा मुलगा हजर होता. अशी अनोखी बिदाई क्वचितच कोणा नवऱ्या मुलीला अनुभवायला मिळाली असेल. पण कोर्टशिपपासूनच वेगळी वाट चालणाऱ्या या जोडप्यासाठी कदाचित ही सामान्य गोष्ट होती.

आज इतक्या वर्षांनी ही गोष्ट गमतीची वाटते, पण पुरुषोत्तमचा हाच खंबीरपणा पुढील आयुष्यात वेळोवेळी उपयोगात आल्याचं जाणवतं. रश्मी यांना पहिलं पोस्टिंग मिळालं ते ठाणे ग्रामीण भागात, दोघं वाडय़ाला राहायला गेले. तोपर्यंत पुरुषोत्तम यांनीही व्यावसायिक मार्ग बदलला होता. तेव्हा सकाळी लवकर उठून, दीड-एक तासाचा प्रवास करून वाडय़ाहून बसने मुंबईला यायचे. रश्मी यांची घरी परतण्याची वेळ निश्चित नसायची, रात्री गस्तही घालायला लागायची. एकदा काही गुंड एका ट्रक ड्रायव्हरला लुटत असल्याचं रश्मी यांनी पाहिलं, त्या मदतीला धावल्या, त्या वेळी गुंडांनी उलट हल्ला करीत दगडफेक केली. त्यामध्ये पोलिसांच्या गाडीच्या काचाही फुटल्या. मात्र, पुरुषोत्तम यांना थेट दुसऱ्या दिवशीच हे समजलं. पण हे आता त्यांच्यासाठीही नेहमीचं झालंय. ‘‘मला तिच्या कामातील धोके माहीत आहेत. सवयही झाली आहे. घरी आल्यानंतर फोन येत राहणं हेही नेहमीचं झालंय. आता ठाणे पोलीस मुख्यालयात रुजू झाल्यापासून अनिश्चितपणा कमी झालाय. पण त्यापूर्वी ट्रॅफिक विभाग सांभाळत असताना सतत फोन सुरू असायचे. ठाणे भागात ट्रॅफिकच्या समस्या नेहमीच्याच, त्यामुळे कधी कधी घरी आल्यावरही पुन्हा बाहेर पडावं लागायचं. सुरुवातीच्या काळात वाडय़ामध्ये राहत असताना तर रात्री-अपरात्री फोन येणं हा नित्यनियम होता. त्यातही फोन करणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे फोन जास्त असायचे.’’ मुंबईपासून इतक्या जवळ असूनही विकासापासून कित्येक कोस दूर असलेल्या या भागाबद्दल रश्मी यांच्या मनात सुरुवातीपासूनच ओलावा होता. त्यामुळे इथे गांजलेल्या स्त्रियांनी कधीही फोन केला तरी त्यांची हाक ताबडतोब ऐकली जायचीच.

सुरुवातीच्या प्रेमाच्या आणि लग्नानंतरच्या काही दिवसांमध्ये हे सगळे अनुभव, वेगळेपण मान्य करणं ठीक. पण आता इतक्या वर्षांनंतर त्रास होत नाही, काही खटकत नाही? यावर पुरुषोत्तम म्हणतात, ‘‘नाही, मला सुरुवातीपासूनच तिच्या कामाची कल्पना होती. पोलिसांचं आयुष्य कसं असतं याचा अंदाज होता आणि तयारीही होती. त्यामुळे काही त्रास होत नाही.’’ व्यावसायिक आयुष्य आणि व्यक्तिगत आयुष्य पूर्णपणे वेगळं ठेवण्याचा निर्णय रश्मी काटेकोरपणे पाळतात. आपली पत्नी पोलीस दलामध्ये उच्चपदावर कार्यरत आहे, असं पुरुषोत्तमही कधी जाणीवपूर्वक सांगत नाहीत. ते स्वत वित्तीय क्षेत्रात स्वतचा व्यवसाय करतात आणि सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच वागण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. डॉ. रश्मी ट्रॅफिक विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असतानाही चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली म्हणून पुरुषोत्तम यांनी पावती घेऊन दंड भरले आहेत. त्यामध्ये काही वावगं वाटत नाही, कारण गाडी चुकीच्या ठिकाणी मीच पार्क केलेली असते, पुरुषोत्तम मोकळ्या मनाने मान्य करतात.

सामान्य माणसाचं पोलिसांबद्दलचं मत अजूनही म्हणावं तितकं आश्वासक नाही, खुद्द पुरुषोत्तम त्याला अपवाद नाहीत. विशेषत पोलिसांनी (अपवाद वगळता) सर्वसामान्य नागरिकांशी ‘सभ्य’ भाषेत बोलावं, अशी त्यांची अपेक्षा असते. काही पोलिसांकडून  होणाऱ्या अरेरावीचा फटका त्यांनाही बसला आहे. अशा वेळीही पुरुषोत्तम डॉ. रश्मी करंदीकर पत्नी असल्याचं सांगत नाहीत, पण घरी आल्यावर मात्र त्रागा व्यक्त होतो. दुसऱ्या बाजूने बघायचं तर पत्नी उच्चपदस्थ पोलीस असल्याचा गरफायदा न घेण्याची पुरुषोत्तम यांची ही प्रवृत्ती

डॉ. रश्मी यांचा भक्कम आधार ठरली आहे. आपल्या तत्त्वांना मुरड न घालता काम करीत राहणं त्यांना शक्य झालं आहे.

ठाणे (ग्रामीण)मध्ये पोस्टिंग असताना वेश्या, बारगर्ल यांचे प्रश्नही रश्मी यांना जवळून बघता आले. गरज पडली तेव्हा अशा मुलींना त्यांनी घरात आसराही दिला आहे. रश्मी यांना असलेल्या सामाजिक भानाची जाणीव पुरुषोत्तम यांना अगदी सुरुवातीपासून आहे. त्यामुळेच यापुढे रश्मी यांनी अशा प्रकारचं काम आणखी वाढवावं, असा त्यांचा आग्रह आहे. डॉक्टरेट मिळवली असली तरी शैक्षणिकदृष्टय़ा आणखी प्रगती करावी आणि लिखाण करावं, अशीही त्यांची इच्छा आहे.

पोलीस खात्यातली नोकरी असल्याने रश्मी यांना प्रत्येक वेळी नवऱ्यासाठी, घरासाठी, कुटुंबासाठी हवा तसा वेळ काढणं शक्य होत नाही. त्यामुळे पुरुषोत्तम यांनी स्वतच्या आवडीनिवडी जोपासल्या आहेत. चित्रपट पाहणं, कीबोर्डवर संगीत वाजवणं, फोटोग्राफी, पेंटिग, फिरणं हे त्यांचे आवडते उद्योग. त्याशिवाय घर सजावटीमध्येही त्यांचा हातखंडा आहे. आत्ताचं संपूर्ण घरही त्यांनीच पूर्णपणे सजवलंय.

डय़ुटीचे तास निश्चित नसलेल्या, काहीशा धोक्याच्या क्षेत्रामध्ये डॉ. रश्मी करंदीकर यांनी आतापर्यंत चांगलं नाव कमावलंय. मात्र, त्यामागे नवरा आणि घरच्या परंपरांची बाजू सांभाळणारे सासू-सासरे यांचा खंबीर पाठिंबा असल्याचं त्या आवर्जून सांगतात. कर्तृत्ववान स्त्रीला तिच्या पतीचा पाठिंबा मिळाला की यश अधिक सोपं होतं.

एकविसाव्या शतकात मोठी झेप घेऊ पाहणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी असा खंबीर पाठिंबा किती आवश्यक असतो, हेच यातून दिसतं.

निमा पाटील – nima_patil@hotmail.com